कोलाड (श्याम लोखंडे )
कुणबी समाोन्नती संघ मुंबई सलग्न ग्रामीण शाखा तालुका रोहा येथे कुणबी समाज नेते माजी आमदार स्व. पा. रा. सानप कुणबी भवन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या सामजिक सभागृहाचे उद्घाटन राज्याच्या कॅबिनेट मंत्री ना. कु.अदितीताई तटकरे यांच्या शुभ हस्ते आज संपन्न होत आहे...
कोकण विकासाचे शिलेदार रायगडाचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे, ना.अदितीताई तटकरे, आ.अनिकेत भाई तटकरे यांच्या विशेष निधीतून बांधण्यात आलेल्या कुणबी समाज नेते तथा माजी आमदार स्व. पा रा सानप कुणबी भवन रोहा येथे नवीन सामाजिक सभागृहाचे उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात आज गुरूवारी ८ फेब्रुवारी रोजी ठिक स.११ : ३० वा. साजरा होत आहे...
रायगड लोकसभेचे लोकप्रिय खासदार सुनिलजी तटकरे यांच्या आशिर्वादाने ना. कु. आदितीताई तटकरे, मंत्री, महिला व बालकल्याण, महाराष्ट्र शासन यांच्या शुभहस्ते व तसेच आ.अनिकेतभाई तटकरे, आमदार विधान परीषद यांच्या प्रमूख उपस्थीत यांच्या अध्यक्षतेखाली व शुभहस्ते हा सोहळा संपन्न होत आहे. तरी तालुक्यातील तसेच विभागीय कुणबी समाज ग्रुपचे कुणबी समाज बांधव यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रोहा तालुका कुणबी समाज अध्यक्ष शिवराम भाऊ शिंदे यांनी केले आहे...
यावेळी शंकरराव म्हसकर मा.अध्यक्ष कु.स. उच्चाधिकार समिती,शंकरराव भगत उपाध्यक्ष, जिल्हा समन्वय समिती रायगड, रामभाऊ सकपाळ माजी सभापती, पं. स. रोहा,सुरेश मगर साहेब ओ. बी. सी. जिल्हा अध्यक्ष रायगड,शिवरामजी महाबळे जि. सरचिटणीस, कु.स.समन्वय समिती रायगड, संतोष पोटफोडे माजी नगराध्यक्ष रोहा नगर परिषद ,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत..
रोहा तालुका कुणबी समाज अध्यक्ष शिवराम भाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम यशस्वी होत आहे.दत्ताराम झोलगे, गोपिनाथ गंभे, सुहास खरीवले, मारुती खांडेकर, महेश बामुगडे सदस्य, जिल्हा युवक कार्यकारीणी, उपाध्यक्ष सहचिटणीस सतिश भगत , रोहा तालुका ग्रुप अध्यक्ष खेळू ढमाळ सोनगाव, राम करंजे मेढा, संदेश लोखंडे कोलाड, यशवंत हळदे ऐनघर, गणपत रेवाळे कुडली,धमेंद्र लाखण गोपाळट,नरेंद्र सकपाळ चणेरा, दिनेश रटाटे, दिलिप आवाद नागोठणे, रामचंद्र चितळकर खांब, रोहा ता. युवक कार्यकारीणी अनंता थिटे अध्यक्ष, उपाध्यक्ष शशिकांत कडू, विकास खांडेकर, संतोष देवळे, पांडुरंग कडू, दिनेश घरट,सरचिटणीस मंगेश देवकर, रमण कापसे, खजिनदार संजय मांडलुस्कर, तसेच मुंबई कार्यकारीणी डॉ. श्री. रोहिदास दुसार माजी पोलिस अधिक्षक ,सुनिल ठाकूर, उपाध्यक्ष, कु.स.संघ. मुंबई,माधव आग्री, मा. अध्यक्ष कु.स.संघ. मुंबई, शरद गंभे, अध्यक्ष, कु.स.संघ.मुंबई, डॉ. सागर सानप सल्लागार कु.स. संघ. मुंबई, डॉ.मंगेश सानप सहसचिव, कु.स.संघ. मुंबई, सिताराम (बाबू) इप्ते कु.स.संघ. मुंबई सर्व तालुका कार्यकारीणी, युवक कार्यकारीणी, महिला कार्यकारीणी सदस्य व कुणबी समाज बांधव, रोहा आदी कुणबी समाज बांधव जनसमुदाय उपस्थित हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार असल्याची माहिती अध्यक्ष शिवराम भाऊ शिंदे यांनी देत यासाठी तालुक्यातील सर्व कुणबी समाज बांधव व पदाधिकारी यांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन केले आहे...

