महाराष्ट्र वेदभुमी

बातमी मागील बातमी खांब देवकान्हे मार्गाच्या कामाला प्रारंभ मुहूर्त सापडला, रखडलेल्या कामाला मूहूर्त सापडला, वृत्त पत्राच्या बातमीची दखल पाठपुराव्याला यश,



कोलाड (श्याम लोखंडे) 

रोहा तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात रखडलेला एकमेव मार्ग खांब पालदाड हा मार्ग गेली अनेक वर्षे रखडलेला आशी याची ओळख नाकारता येत नाही.मुंबई गोवा महामार्गाला जोडला गेलेला उपरस्ता म्हणजे खांब देवकान्हे पालदाड मार्गावरील खांब देवकान्हे मार्ग दरम्यान अरुंद रस्ता त्यात अनेक मोठ मोठे खाच खळगे त्यामुळे खड्ड्यांमुळे प्रवाशांना काही ठिकाणी मोठी तारेवरची कसरत करावी लागत होती अनेक आपघात देखील घडले याचा पाठपुरावा महाराष्ट्र वेधभूमी वृत्त पत्राने येथील मोठी गंभिर समस्या यावर उपाय योजना संबधीत खात्याकडून करण्यात याव्या या मार्गाचे डांबरीकरण करण्यात यावे अशी अनेकदा नागरीक मागणी करत आहेत अशी भूमिका वृत्त पत्राने घेतली त्यामुळे आज खऱ्या अर्थाने या पाठपुराव्याला यश आले असून या मार्गाचे काम सुरू केले गेले आहे त्यामुळे येथील नागरीक आणि प्रवाशी वर्गातून आमच्या प्रतिनिधी सह वृत्त पत्राचे अभिनंदन केले जात आहे...


गेली अनेक वर्ष या मार्गाची रखडपट्टी याचे येथील राजकारणी तसेच स्थानिक पुढारी त्याच बरोबर सरकारला सुख दुःख नाहीत दरम्यानच्या खांब देवकान्हे मार्गाची तर अक्षरशः गंभीर अवस्था असल्याने दुचाकीस्वारांना मोठी तारेवरची कसरत तर पादचारी प्रवाशी तसेच शाळकरी विद्यार्थी यांना देखील त्या खाच खळगे व दगड धोंडे यांचा त्रास सहन करावा लागत होता त्याच बरोबर या रखडलेले मार्गाचे काम अथवा त्याची दुरूस्ती संबधीत अधिकारी वर्गाने तसेच स्थानिक लोप्रतिनिधींनी यांच्या निदर्शनास आणून देण्याचे काम व  याची बातमी महाराष्ट्र वेधभूमी वृत्तपत्राने आपल्या वृत्तपत्रात अनेकदा छापून आल्यावर त्यावर सोमवार मंगळवारी 6 जानेवारी पासून स्थानिक लोकप्रतिनधींकडून व संबधीत खात्याकडून तत्काळ काम करण्यास भाग पाडत त्याचे नव्याने खडीकरण डांबरीकण  मशनरी तसेच कामगार लाऊन करण्यास सुरू केले असल्याने अनेकांनी आनंद तसेच कामाबाबत समाधान व्यक्त केला आहे.

या अरुंद आणि धोकादायक महामार्गावरील भयानक पडल्याल्या खड्यांची दखल घेण्यासाठी तसेच त्यावर उपाय योजना करण्यात याव्यात यासाठी नेहमी महाराष्ट्र वेधभूमी वृत्तपत्राचे स्थानिक प्रतिनिधी येथील समाज घटकाला न्याय हक्कासाठी लढा देत असतात तसेच वृत्तपत्र त्या बातम्या लावून धरतात त्यामुळेच समाज घटकाला न्याय मिळत आहे मार्गावर पडलेले भले मोठे खड्डे आणि त्यात पावसाळ्यात साचून राहणारा गुडघाभर पाणी त्यामुळे येथील ये जा करत असणाऱ्या प्रवाशांना तसेच वाहन चालकांना मोठा आपघाताचा धोका निर्माण झाला होता परंतु पुढारी वृत्तपत्रांनी याची गांभीर्यपूर्वक दखल घेत आपल्या वृत्तपत्रात ती बातमी छापून आल्या बरोबरच सदरच्या खात्याला ठेकेदार याला जाग येत त्यांनी त्याची दखल घेत देवकान्हे धानकान्हे पुलाखाली पर्यंतचे काम प्रथम सूरू केले असल्याने महाराष्ट्र वेधभूमी पेपर वृत्त पत्राचे  स्थानिक तरुणांकडून तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून आभार मानले जात आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post