महाराष्ट्र वेदभुमी

दी लाईफ फाऊंडेशन तर्फे अलिबाग येथे महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर आयोजन

अब्दुल.सोगावकर : सोगांव अलिबाग

सामाजिक कार्यात नेहमीच सहकार्याची व योगदानाची महत्वपूर्ण भूमिका घेत असलेल्या दी लाईफ फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने विद्यार्थ्यांना घडवण्यात महत्वाची भूमिका घेणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व महिला बचत गटाच्या महिला व इतर महिला यांची मोफत कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित केले होते... 

       दी लाईफ फाऊंडेशन आणि कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे बुधवार दि. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी चेंढरे ग्रामपंचायत हॉल, अलिबाग येथे आयोजन करण्यात आले.

             हे आरोग्य तपासणी शिबिर दी लाईफ फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त पूनम लालवानी यांच्या मार्गदर्शनाखाली, अलिबाग तालुका आरोग्य अधिकारी, एकात्मिक बालविकास प्रकल्प अलिबाग, यांच्या सहकार्याने अलिबाग तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच ज्यांचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांसाठी आयोजित करण्यात आले...

            या शिबिरात नाक, कान, घसा तपासणी व जनरल फिजिशिअन तपासणी तसेच स्त्रीरोग तज्ञांकडून महिलांची तपासणी करण्यात आली...

महिलांना आरोग्य तपासणी बरोबरच समुपदेशनही करण्यात आले. या आरोग्य तपासणी शिबिरात अलिबाग तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी गीतांजली पाटील यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर मोठ्या संख्येने उपस्थित होत्या...

         याशिबिरात तपासणी करण्यासाठी कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन मुंबई च्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर -डायग्नोस्टिक सर्व्हिसेस श्रीमती नीता मोरे, असिस्टंट डायरेक्टर-डायग्नोस्टिक सर्व्हिसेस श्रीमती मिनल परब, स्त्रीरोग तज्ञ डॉ.रचना मेहरा व डॉ. शीला नाईक, तसेच फिजिशियन डॉ. अमृता माने व नाक,कान,घसा तज्ञ डॉ. राजीव केनीइत्यादीनी उपस्थित राहून तपासणी केली. यावेळी अत्यंत तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी वैद्यकीय महागड्या तपासण्या अगदी मोफत व एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल दी लाईफ फाऊंडेशनचे विशेष आभार मानले...

              हे शिबिर आयोजित करण्यासाठी दी लाईफ फाऊंडेशनचे कार्यकर्ते शिलानंद इंगळे, मुस्कान शेख, प्रणय ओव्हाळ, राखी राणे आणि पल्लवी राणे यांनी मेहनत घेतली...

फोटो लाईन : दी लाईफ फाऊंडेशन तर्फे आयोजित मोफत कॅन्सर तपासणी आरोग्य शिबिरात सहभागी अंगणवाडी सेविका, मदतनीस व मान्यवर

Post a Comment

Previous Post Next Post