शहानवाज मुकादम/रोहा
मो.7972420502
संबंधित मूळ ठेकेदार व अभियंता यांचा दुर्लक्ष, कामे मात्र दलालाकडूनच!
निकृष्ट कामाची कॉलीटी कंट्रोल करुन चौकशीअंत कारवाईची मागणीचा ग्रामसभेत ठराव मंजूर...
रोहा :दि:१५ फेब्र २०२४ तालुक्यातील खांबेरे आणी खैरेखुर्द ग्रामपंचायत हद्दीतील जलजीवन मिशन योजनेच्या कामात दिरंगाई आणी निकृष्ट दर्जाचे कामे याला जबाबदार प्रशासनच,संबंधित मुलठेकेदार व अभियंता यांचा दुर्लक्ष, कामे मात्र दलालाकरडूनच कामात दिरंगाई करणारे मुळ ठेकेदार याना कायम स्वरुपी ब्लॅक लिस्टवर टाकणे व निकृष्ट दर्जेच्या कामाची कॉलीटी कंट्रोल करुन चौकशीअंत कारवाईच्या मागणी चा खैरेखुर्द ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत सर्वांमते ठराव मंजूर.
तसेच खैरेखुर्द गावातील भारत निर्माण योजने ची जुनी पाईप लाईन ठिकठिकाणी तोडल्याने गावातील रस्त्यावरील खडड्यात पाणी साठवण होउन दुशीत पाणी ग्रामस्थांना पिणे भाग पडले असुन रोगराई होण्याची डाट शक्यता असल्याने ग्रामपंचायत खैरेखुर्द कडून राजिप व आरोग्य विभागास पत्रव्यवहार करण्यात यावे असेही ठराव मंजूर करण्यात आले...
तसेच खांबेरे ग्रामपंचायत हद्दीतील १३ गावांपैकी (खांबेरे,टेमघर, डिंगणवाडी) प्रगतिपथावर असून १० गावांच्या योजनेच्या कामास दिरंगाई होत असून शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने संबंधित ठेकेदार यांना कायम स्वरुपी ब्लॅक लिस्टवर टाकण्यात यावा आशी मागणी ग्रामपंचायत खांबेरेचे विद्यमान सरपंच अतिश मोरे करणार असल्याचे म्हणाले.
जल जीवन मिशन योजनेची रायगड जिल्ह्यात विविध कामे सुरू आहेत...या कामात जाणीवपूर्वक दिरंगाई करणाऱ्या आणि मुदतीत कामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात येईल, अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली होती... विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य जयंत पाटील यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता...तसेच कामांची संख्या जास्त आणि कंत्राटदार संख्या कमी अशी स्थिती असल्याने एकाच कंत्राटदाराला अनेक कामे दिल्याचे रायगडसह इतर जिल्ह्यांतही दिसते असे स्पष्ट केले होते...
नेमके प्रकरण काय आहे?
रायगड जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पिण्याचे पाणी देण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने तब्बल ९१३ कोटी ३८ लाखांच्या १४०५ जलजीवन योजना राबवण्यास सुरुवात केली होती..मात्र या अभियानाला टेंडर प्रक्रियेपासूनच ग्रहण लागले आहे.तर एकेका ठेकेदाराला सुमारे १०० कोटींची कामे मिळाल्याने ती दर्जेदार आणि वेळेवर कशी पूर्ण होणार?
त्यातच प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने या योजनेच्या कामात दिरंगाई, निकृष्ट दर्जा आणी भ्रष्टाचार होण्याची दाट शक्यता असल्याचा सवाल केला जात आहे...
स्थानिक आमदार खासदार यांच्याकडून विकास कामांवर दखल घेण्यात येत नसुन २०२४ च्या होणाऱ्या निवडणुकीत याचा उत्तर देण्यात येईल आशी प्रतिक्रिया सामान्यांकडुन उपस्थित होत आहे...
