कोलाड (श्याम लोखंडे)
रोहा तालुक्यातील खांब येथील किल्ले सुरगड पायथ्याशी वसलेल्या वैजनाथ गावच्या रायगड जिल्हा परिषद शाळा वैजनाथ येथे सामजिक बांधिलकीचे जतन करत सामजिक शैक्षिणक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या दुर्गवीर प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने या शाळेला कॉम्पुटर इंटरनेट ऑनलाईन च्या जमान्यात तसेच बदलत्या शिक्षणाचे धोरण लक्षात घेऊन डेल कंपनीचा लॅपटॉप तसेच त्याला लागणारे डिजीटल साहित्य वाटप करण्यात आले...
दुर्गवीर प्रतिष्ठान संस्थेने जवळजवळ १०ते१२वर्ष येथे असलेल्या ऐतीहासिक सुरगड किल्ल्यावर संवर्धन करून अनेक वस्तू उजेडात आणले आहेत संवर्धन करता करता आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून ते गडाच्या पायथ्याशी असलेल्या दुर्गम भागातील शाळेत एनेक विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्यांना चांगले शिक्षण मिळेल या अनुषंगाने या साहित्याचे वाटप करण्यात आले.तसेच विविध उपक्रम राबविले जात असताना आरोग्य विषयक शिबिर मोठ्या उत्साहात पार पाडत असतात त्या अनुषंगाने त्यांनी राजिप वैजनाथ शाळेत लॉपटॉप वस्तू भेट स्वरूपात देण्याचं ठरवलं होते त्या जाहीर वचनाची पूर्तता या संस्थेने करत लॅपटॉप भेट दिले...
या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी शिक्षक तसेच पालक आणि वैजनाथ ग्रामस्थांची बहुसंख्येने उपस्थिती लाभली होती. वैजनाथ गावाचे पोलिस पाटील मनोज मारुती सावरकर, यांनी दुर्गवीर प्रतिष्ठान संस्थेचे विषेश आभार मानले ते म्हणाले की दुर्गवीरांच कौतुक करावे तेवढे थोडेच आहे त्यांचे सामजिक कार्य हे प्रेरणादायी आहे असे सांगत त्यांनी सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मनःपुर्वक आभार व्यक्त केले... तद्नंतर दुर्गवीर प्रतिष्ठान संस्थेचे सभासद किशोर सावरकर यांचे शालश्रीफल देवून सत्कार करण्यात आले.या कार्यक्रमात दुर्गवीर प्रतिष्ठान संस्थेचे सभासद किशोर सावरकर, किशोरी किशोर सावरकर,मानशी महेंद्र पारठे,जितेश पारठे, निवृत्ती पवार, सुरगडाचे गडपाल महेंद्र पारठे, यांच्या हस्ते शाळेतील मुलांना लॅपटॉप वाटत केले...
लॅपटॉप वाटप करण्यात आले...वैजनाथ गावाचे ग्रामस्थ मनोज सावरकर, हेमंत महाबले, महादेव परबलकर, मनिषा मारुती सावरकर,निशा पवार तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ मोनिका बद्रिके, अश्विनी सावरकर प्रियांका जाधव,सोनल पवार राजेश्री घरट, निकिता चोरगे, दिया जाधव, सायली महाबले, आणि शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका सौ ममता रमेश रोहेकर उपस्थित सह शिक्षक आदी विद्यार्थी उपस्थित होते...
शाळेस दिलेल्या या महत्वपूर्ण भेटीसाठी सर्व ग्रामस्थांनी मुख्याध्यापकांनी व शाळा व्यवस्थापन समिती वैजनाथ यांनी दुर्गवीर प्रतिष्ठान संस्थेचे पूनच्छ आभार मानून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली...

