सोगाव - अब्दुल सोगावकर
रायगड महासंस्कृती महोत्सव नुकतेच अलिबाग येथे जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात चोंढी, मुशेत व सिद्धी क्लास येथील मुलांनी अथर्वशीर्ष पठण केले. यावेळी मान्यवरांनी मुलांचे विशेष कौतुक केले...
चोंढी येथील संस्कृती केंद्रामध्ये मुलांमध्ये अध्यात्मिक भावना निर्माण करण्यासाठी अथर्वशीर्ष, भवानी अष्टक, पंधरावा अध्याय असे मंत्र शिकविले जात आहेत, यासोबतच मुलांना योगसाधना मेडिटेशन, गड किल्यांवर घेऊन जात त्यांची माहिती व पावित्र्य, मैदानी खेळ, बौद्धिक खेळ तसेच भारतीय संस्कृती याविषयी इतर महत्वाची माहिती चोंढी येथील संस्कृती केंद्राच्यावतीने देण्यात येत आहे. मुलांना मोबाईल पासून दूर ठेवून त्यांना वाचन, पठण, स्मरण व योग साधनेच्या माध्यमातून मुलांकडून करून घेतले जात आहे....
यासाठी संपदा संदीप पोंगडे, सिद्धी संतोष घरत, प्रीती प्रसाद गायकवाड, मयुरी प्रशांत पाटील, भूमी भरत कातूर्डे, दुर्वा दिनेश कातूर्डे, करिष्मा म्हात्रे मेहनत घेत आहेत...
फोटो लाईन :
पहिल्या चित्रात - रायगड महासंस्कृती महोत्सवात विद्यार्थी अथर्वशीर्ष पठण करताना विद्यार्थी,
दुसऱ्या चित्रात : रायगड महासंस्कृती महोत्सवात चोंढी परिसरातील अथर्वशीर्ष पठण साठी उपस्थित विद्यार्थी,

