पुगांव रोहा (नंदकुमार कळमकर )
मुंबई- गोवा महामार्गावरील आंबेवाडी नाक्यावरील प्रभाकर हॉटेलच्या समोर दररोज मोकाट गु्रांचा हैदोस सुरु असुन रस्त्याला गोठा समजून रस्त्यावरच ठाण मांडून बसत असल्यामुळे या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे...
रोहा तालुक्यातील मोठया प्रमाणात शेतकऱ्यांनी आपल्याजवळील शेत जमिनी मुंबई-दिल्ली कडील धनिकांना विकल्या असुन जमिनी विकण्याचा व्यावसाय जोमाने झाला आहे. यातच आपल्याकडील शेतजमिनी विकणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्याकडे असणारी बिनकामी गुरे मोकाट सोडून दिली असुन या गुरांना बसण्यासाठी कोणताही आधार राहिला नाही यामुळे ही गुरे गोठा समजून रस्त्यावर ठाण मांडून बसत आहेत...
मुंबई-गोवा हायवेवरील असणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनी धनिकांना किंवा खाजगी कंपनीला विकल्यामुळे या विकत घेतलेल्या मालकांनी शेतीभोवती तारेचे कुंपण घातले आहे.यामुळे शेती विकलेल्या शेतकऱ्यांची गुरे चरण्यासाठी जागा राहिली नसल्याने ही मोकाट सोडलेली गुरे रस्त्यातच ठाण मांडून बसत आहेत...
सकाळ होताच हि गुरे चरण्यासाठी आजूबाजूला असणाऱ्या जंगलात जातात परंतु संध्याकाळी हि गुरे परत येऊन रस्त्यालाच गोठा समजून रस्त्यावर बसतात.पण या महामार्गांवर हि गुरे आल्यानंतर एकमेकांशी झोँबी करतांना दिसतात यांच्या झुंडीमुळे येणाऱ्या जाणाऱ्या टूव्हीलर स्वार यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे याशिवाय मोठया वाहनाने एखाद्या गुराला अपघात झाला तर शेतकरी नुकसान भरपाई घेण्यासाठी धावत येतात परंतु वाहन चालक या गुरांमुळे जखमी झाला तर हेच गुरांचे मालक समोर येत नाही.या रस्त्यात बस्तान मांडून बसलेल्या गुरांमुळे अनेकवेळा वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. अशा उनाड गु्रांचा बंदोबस्त संबंधितांकडून केला जावा अशी मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे.
