कोलाड (श्याम लोखंडे)
रोहा तालुक्यातील स्थानिक सुरगड संवर्धन संस्था आणि श्री शिवशंभू युवा मंडळ गोवे यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले सुरगडावर शिवजयंती निमित्त अखंड गडसंवर्धन मोहिम क्र. २७ मोठ्या उत्साहात साजरी करत येथील गड स्वच्छ्ता करत शिवरायांना दिली मानवंदना...
१९ फेब्रुवारी तारखेप्रमाणे शिवजयंती, सगळीकडे छत्रपती शिवरायांचा नामघोष आणि संपुर्ण वातावरण शिवमय असताना. किल्ले सुरगडाच्या शिलेदारांना वेध लागले होते ते किल्ले सुरगडाच्या संवर्धन मोहिमेचे आणि त्याचे औचित्य साधून येथील शिलेदारांनी एकत्रित हि मोहीम राबवत केला पुन्हा एक अनोखा उपक्रम..
खऱ्या अर्थाने शिवरायांना अभिप्रेत शिवजयंती काय असेल, तर ती म्हणजे ज्या गडकोटांनी देव देश आणि धर्म राखला. जे गडकोट शिवरायांना प्राणप्रिय होते त्या गडकोटांच संवर्धन आणि जतन. हाच संकल्प मनात ठेवून सुरगडाच्या शिलेदारांनी या मोहिमेचं नियोजन केलं. आणि या मोहिमेत श्री. शिवशंभू युवा मंडऴ गोवेच्या तरूणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सुरगडावर अविरत चाललेल्या गडसंवर्धनाची प्रेरणा घेत खांब पंचक्रोशीत नवा आदर्श निर्माण करत गोवे गावातील तरूणांनी २०२४ वर्षाची शिवजयंती गडसंवर्धन करून साजरी करायची असा संकल्प करत स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेच्या मोहिम क्र. २७ मधे सहभागी होत. गडावरील देव देवतांची मंदिर, त्याभोवतालचा परीसर आणि राजसदर परीसर काटेरी झाडेझूडपे, गवत काढून स्वच्छ केला...
या मोहिमेमधे कोलाड पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल पोलिस डी.एन. पांचाळ यांनी सदिच्छा भेट दिली. गडावर चाललेल्या संवर्धनाविषयी किल्ले सुरगडाच्या शिलेदारांच कोतूक त्यांनी केलं. आजच्या दिवशी अशी मोहिम घेऊन खऱ्या अर्थाने शिवकार्य आपण करत आहात अशी शाब्बासकीची थाप त्यांनी मोहिमेत सहभागी झालेlyacशिलेदारांना दिली. यावेळी स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेचे अध्यक्ष मयुर कापसे, सचिव सुयोग धामणसे, उपाध्यक्ष किशोर सावरकर, गडपाल महेंद्र पार्टे आणि समस्त सुरगडाच्या शिलेदारांनी श्री. पांचाळ साहेब आणि श्री. शिवशंभू युवा मंडळ गोवे चे अध्यक्ष किरण पवार यांचे शाल श्रीफळ देऊन यावेळी सन्मान केला..
या मोहिमेची सांगता करताना श्री शिवशंभू युवा मंडऴ गोवे चे सचिव सुभाष पवार यांनी आभार व्यक्त केले आणि सुरगडाच्या गडसंवर्धनासाठी मंडळातून जास्तीत जास्त युवकांचा सहभाग उपलब्ध करून देण्याचा आज नवा संकल्प केला...

