रोहा,दि.१९(प्रतिनिधी)
रोहा तालुक्यातील धाटाव गावाचे स्व.सामाजिक कार्यकर्ते ह.भ.प.चंद्रकांत शिवराम मोरे यांच्या बुध..दि.२१ फेब्रुवारी रोजी सकाळी ठिक १० वा.धाटाव येथील निवासस्थानी संपन्न होणाऱ्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार तथा प्रबोधनकार वाणीभूषण सुप्रसिद्ध किर्तनकार भूषण महाराज तळणीकर मु,तळणी जि, लातूर यांच्या किर्तनरूपी सेवेचे आयोजन करण्यात आले आहे...
वारकरी परंपरेचा वारसा जपत वयाच्या ११ व्या वर्षापासून जपून किर्तनास प्रारंभ करणारे व सध्याचे वय वर्ष २३ असणारे किर्तनकार भूषण महाराज तळणीकर यांना लहानपणा पासून आध्यात्मिक विचारांची आवड निर्माण झाली आहे...
प्रगल्भ विचारसरणी लहानपणापासून ते आजतागायत वारकरी परंपरेचे किर्तन कसं असावं याच ऊदाहरण म्हणजे ह भ प भुषण महाराज तळणीकर.किर्तन मर्यादा याच्या पलीकडे न जाता वारकरी परंपरा जपण्याचा प्रयत्न सध्याच्या फॅशनेबल दुनियेत त्यांनी जपला आहे.साधे राहणीमान आणि उच्च विचार सरणी हि त्यांची खास ओळख.राहणीमान सुद्धा जुन्या त्यांच्या पारंपरिक पोशाखामधे तर सर्व तरुणांनी आदर्श घ्यावा असे.आदर्शवत तरुण व्यक्तिमत्त्व व गोड वाणी म्हणून भुषण महाराज तळणीकर संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द किर्तनकार म्हणून ते ओळखले जातात... तर स्व.सामाजिक कार्यकर्ते ह.भ.प.चंद्रकांत शिवराम मोरे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त संपन्न होणाऱ्या या पुण्यस्मरण दिनानिमित्त किर्तनरूपी सेवेसह विविध प्रकारच्या धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या सर्व कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मोरे परिवाराचे वतीने करण्यात आले आहे...
