महाराष्ट्र वेदभुमी

अलिबाग तालुक्यातील बामणसुरे आदिवासीवाडी आदिवासी समाजबांधवांना अध्यात्मिक माध्यमातून व्यसनमुक्ती, व्यक्ती विकास जनजागृती

 


अब्दुल सोगावकर अलिबाग

सोगाव :अलिबाग तालुक्यातील बामणसुरे आदिवासीवाडी येथील आदिवासी समाज बांधवांना अध्यात्मिकतेच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, व्यक्ती विकास, आरोग्य, शैक्षणिक आदी विकासात्मकतेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी श्री जगद्गुरू स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थेच्या वतीने मंगळवार दि.६ फेब्रुवारी २०२४ रोजी नवीन आरती सोहळा कार्यक्रमाला अविनाश पाटील व संजीवनी पवार यांच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आली.

          यावेळी गावातील मुख्य रस्त्यावरून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली, यामध्ये आदिवासी बांधवांसह बामणसुरे पंचक्रोशीतील ग्रामस्थ व प्रमुख मान्यवर, स्वामी नरेंद्राचार्य महाराज सेवा समिती, महिला सेना, युवा सेना, अलिबाग तालुक्यातील गुरुबंधू व गुरू भगिनी उपस्थित होते. आरती सोहळा कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थानचे शिवम गुरुजी यांच्याहस्ते करण्यात आले, तर यावेळी आध्यात्मिक प्रवचनातून प्रवचनकार गंगाधर गडकरी यांनी परमेश्वराच्या सानिध्याबाबतीत महत्त्व पटवून देत आदिवासी बांधवांना आध्यात्मिकतेच्या माध्यमातून व्यसनमुक्तीकडे नेण्यासाठी व विकासात्मकतेच्या दृष्टीने आरोग्य व शैक्षणिक आदी विकास करण्यासाठी महत्वपूर्ण असे प्रवचन करत जनजागृती केली. 

         या कार्यक्रमाला उपस्थित किहीम सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांनी सांगितले की, आपल्या किहीम ग्रामपंचायत हद्दीतील महत्वाची बामणसुरे आदिवासीवाडी आहे, या आदिवासी वाडीवर जगद्गुरू स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांची आरती सुरू करून बांधवांमध्ये अध्यात्मिक भावना वाढावी यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे, यामुळे सर्व बांधव व्यसनमुक्तीकडे जाऊन विकासाच्या दृष्टीने जोडला जाणार आहे, याबद्दल मी सर्व भक्तगणांचे आभार व्यक्त करतो, यापुढेही मी माझ्या तमाम बांधवांना माझ्यापासून होणारी सर्व मदत आपल्याला करणार असल्याचे सांगितले.

         यावेळी झिराड सरपंच दर्शना दिलीप भोईर, चोंढी - बामणसुरे पोलीस पाटील प्रिती गायकवाड, बामणसुरे आदिवासी महिला व पुरुष समाज बांधव, स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थेचे अलिबाग तालुका अध्यक्ष सचिन पाटील यांच्यासह अंदाजे चारशे भक्तगण उपस्थित होते. बामणसुरे आदिवासी समाज बांधवांनी कार्यक्रमाला आलेल्या सर्व भक्तगण व मान्यवरांसाठी महाप्रसादाचे नियोजन केले होते. सर्वानी महाप्रसादाचा लाभ घेतला, तर या कार्यक्रमाला जिल्हा अध्यात्मिक प्रमुख दिनेश पाटील यांनी मार्गदर्शन केले, तसेच हितेश यांनी आपल्यापरीने योग्य ते योगदान दिले, यावेळी सर्व उपस्थित भक्तगणांनी अविनाश पाटील व संजीवनी पवार यांनी आरती सुरू करण्यात महत्वाची भूमिका बजावली याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी आवर्जून किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी विशेष सहकार्य केल्याबद्दल संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला...

फोटो लाईन :बामणसुरे आदिवासी वाडी येथे आरती कार्यक्रमाचे उद्घाटनावेळी उपस्थित किहीम सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांचे सन्मान करताना मान्यवर,

Post a Comment

Previous Post Next Post