कोलाड (श्याम लोखंडे)
रोहा तसेच माणगाव तालुक्यातील नामांकित असणाऱ्या कोलाड येथील सुधागड एज्युकेशनचे माध्यमिक हायस्कूल तसेच माणगाव तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय रातवड मधील शैक्षणिक वर्षातील तातकालीन इयत्ता ५ वी ते १० वी.मध्ये शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच माणगाव येथील नामांकित आसलेल्या रिव्हर फार्म येथे मोठया उत्साह व आनंद वातावरणात संपन्न झाला....
सात वर्षांपूर्वी उमेश भोसले,विजय साटम, शैलेश पालकर,या माजी विद्यार्थी यांनी आपले जुने मित्र परिवाराला एकत्र आणण्यासाठी वॉट्सप फेसबूक च्या माध्यमातून ग्रुप तयार केले असून यांनी सर्व माजी विद्यार्थी यांचे मोबाईल नंबर एकत्रित करून व व्हॉट्स ॲप द्वारे एक मैत्री च ग्रुप या नावाने जवळपासचे माजी विद्यार्थी यांचे ग्रुप तयार करुन एकमेकांशी संपर्क साधत मैत्रीपूर्ण नात्याच जतन करत गेली सात वर्षे अविरतपणे हा सस्नेहमेळावा साजरा करतात सर्व मित्र रोहा, धाटाव,खांब,कोलाड, सुतारवाडी,भुवन,येथून एकत्र जमून नंतर माणगाव येथील येथे स्नेह मेळाव्यात एकत्र आले...
नात मैत्रीचं आपुलकी प्रेमाची सुसंवाद विश्वासाचा असा आगळा वेगळा उपक्रम साजरा करण्यासाठी यावेळी उमेश भोसले, विजय साटम,शैलेश पालकर, शांताराम उभारे,अजित गुळगुले,निलेश सोंडकर, महेश चव्हाण,नम्रता सुतार,साधना मासक,लीना सावंत, मिनाक्षी काटे, रेश्मा महाडीक,उषा गजमल,स्वाती जाधव,संध्या जाधव,सुप्रिया दपके,विद्या,सविता गंभीर,अनिता शिंदे,अनिता शेडगे,बेबी ढमाले , इत्यादी माजी विद्यार्थी विद्यार्थीनी सहभागी झाले.तसेच सर्व माजी विद्यार्थी यांनी एकमेकांशी सुसंवाद साधत जुन्या आठवणींना उजाला देत हा स्नेहसंमेलन मोठ्या उत्साह वातावरणात तसेच विविध सांघिक खेळ त्याच बरोबर बहारदार गाण्यांचा कार्यक्रम संपन्न करत शेवटी स्नेह भोजन तसेच खेळात विजयी ठरलेल्याने भेटू वस्तू देत त्यांचे सन्मान करुन स्नेह मेळाव्याची सांगता करण्यात आली...

