कोलाड (श्याम लोखंडे)
रयतेचे राजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती रोहा तालुक्यातील खांब विभागातील इंग्रजी क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ज्ञानांकुर स्कूल च्या विद्यार्थ्यांनी शोभायात्रा तसेच लेझिम पथक व विविध सांस्कृतिक कार्यक्रम करून उत्साहात साजरी केली...
यावेळी शाळेच्या प्रांगणात विद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग यांनी शोभायात्रेतून नृत्य करत तसेच राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा घोषणांचा जय जयकार विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान करून भव्य स्वरूपात सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले...तर विद्यार्थ्यांनी शिवगर्जना व मानवंदना आपल्या बुलंदी आवाजात छत्रपती शिवाजी महाराज यांना दिल्या...
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मौत्सव कार्यक्रमाप्रसंगी कोलाड खांब परिसरातील सामजिक कार्यकर्ते तथा शिवप्रेमी अनंत सानप,समीर पडवळ स्कूल कमिटीचे अध्यक्ष सुरज कचरे,महादेव कचरे , शाळेच्या मुख्याध्यापिका रिया लोखंडे सह आदी विद्यार्थी व शिक्षक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते...
शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साही वातावरणात रंगलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म उत्सवानिमित्त कार्यक्रमांत विद्यार्थ्यानी शोभा यात्रा, लेझिम पथक,विविध कला,पोहाडे गात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली...
सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या विद्यार्थिनी कु.आर्या लोखंडे आणि श्रेया भोसले यांनी केले तर सदरच्या कार्यक्रमाला लाभलेले मान्यवर यांनी या प्रसंगी उत्तम मार्गदर्शन केले तर सदरचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विदयार्थी शिक्षवृंद यांनी अथक परिश्रम घेतले...
