प्रतिनिधी - सत्यप्रसाद आडाव चणेरा
दि. २१ फेब्रुवारी २०२४ रोजी एम. बी. मोरे फाउंडेशन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये "एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड, रोहा व औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, महाराष्ट्र शासन" यांच्या संयुक्त विद्यमाने "नागरी संरक्षण" (Civil Defence) या विषयवार प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणात आत्म संरक्षण व इतरांचे संरक्षण आपत्तीच्या वेळेत कसे करावे, तसेच आपत्ती व्यवस्थापनाचे उत्कृष्ट सादरीकरण व प्रात्यक्षिक एम. के. म्हात्रे डेप्युटी चीफ कंट्रोलर ऑफ़ सिव्हिल डिफेन्स उरण यांच्या मार्फ़त झाले...
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले. यासाठी सुनील ठाकरे डेप्युटी डायरेक्टर औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय महाराष्ट्र शासन, त्यासमवेत सुदाम कापरे इ. एस्. एच. हेड ऑफ़ एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड व त्यांचे सहकारी जयवंत गोळे व कमलाकर कदम फायर ऑफिसर उपस्थित होते... एम. बी. मोरे फाउंडेशनचे सदस्य मा.अशोकराव मोरे यांच्या महत्वपूर्ण उपस्थितिमध्ये हा कार्यक्रम सुरु झाला. तसेच एम. बी. मोरे फाउंडेशन इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या नंदिनी जोशी यांच्या अंतर्गत हे कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहन पाटिल यांनी केले व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या मदतीने हा कार्यक्रम संपन्न झाला...

