सोगाव अलिबाग: अब्दुल सोगवकार
अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे सोमवार दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी शिवजयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मोठ्या प्रमाणात फुलांनी सजवण्यात आले होते...
यावेळी नुकतीच मापगाव ग्रामपंचायतीची सरपंच व उपसरपंच, सदस्य यांची पाच वर्षाची मुदत संपली असल्यामुळे ग्रामपंचायती वर प्रशासक म्हणून साळावकर हे कार्यभार करत आहेत, शिवजयंती निमित्ताने मापगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील प्रतिमेला प्रशासक साळावकर यांनी पूजन करून पुष्पहार अर्पण केले, यानंतर ग्रामसेविका माधुरी भोईर, ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुनिल थळे व इतर माजी सदस्यांनी, तसेच मान्यवर ग्रामस्थांनी पूजन व पुष्पहार अर्पण केले...
यावेळी सागर गावंड, ऋत्विज राऊत, यश मापगावकर यांनी मानवंदना दिली... तसेच यावेळी गणपतीची आरती व शिवाजी महाराज यांची आरती घेण्यात आली. यानंतर झालेल्या कार्यक्रमात राजिप शाळा मापगाव येथील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीत व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या थोर कारकीर्द बाबतीत विद्यार्थ्यांनी भाषणे सादर करत सर्व उपस्थितांची मने जिंकली. तर सागर, यश, ऋतिक या विद्यार्थ्यांनी लोकगीते सादर उत्साह निर्माण केले तसेच सागर गावंड यांनी शिवाजी महाराज यांच्या विषयी स्तुतीपर भाषण केले. या कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या व कलाविष्कार सादर केलेल्या सर्वांनाच प्रशासक व माजी सरपंच सुनिल थळे यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. शिवजयंती कार्यक्रमाला मापगाव पंचक्रोशीतील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..
या मापगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक जोशी यांनी केले...
फोटो लाईन :
पहिल्या चित्रात- मापगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंती निमित्ताने वंदन करताना उपस्थित मान्यवर,
दुसऱ्या चित्रात - शिवजयंती निमित्ताने कार्यक्रमात कला सादर करणारे सहभागी विद्यार्थ्यांना बक्षिसे देतांना मान्यवर

