शहानवाज मुकादम/रोहा
मो,7972420502(७९७२४२०५०२)
शासनाकडून दुर्लक्ष!
सदर योजनेंची वरिष्ठांकडून चौकशीअंत कारवाई होईपर्यंत ठेकेदारास बिल आदा करण्यास ग्रामस्थांची हरकत..
रोहा:दि:१९ फेब्र २०२४ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वांकाक्षी प्रकल्प म्हणजे जलजीवन मिशन. कोट्यवधीच्या निधीची तरतूद या प्रकल्पासाठी करण्यात आली...
शासनाने सुरू केलेल्या जल जीवन मिशनचा उद्देश ग्रामीण भागात पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे हा असून वाढत्या लोकसंख्येबरोबर पाण्याची समस्याही वाढत आहेत... अनेक ग्रामीण भागात पाण्याची सोय नाही... लोकांना पाणी आणण्यासाठी अनेक अंतर पायी जावे लागते... ग्रामस्थांच्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाय व्हावा म्हणून शासनाने महत्त्वकांक्षी योजना सुरू केली...
मात्र खैरेखुर्द (ता. रोहा) ग्रुप ग्राम पंचायत अंतर्गत सुरू असलेले जीवन मिशनचे काम अंदाजपत्रकानुसार न करता निकृष्ट दर्जाचे काम सुरू असून याकडे संबंधित आधिकरी यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केल्याची चर्चा ऐकवयास येत आहे... यामुळे शासनाच्या अतिशय महत्त्वकांक्षी सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या उद्देशालाच तिलांजली देत संबंधित ठेकेदार व अधिकारी यांनी संगणमत करून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची चर्चा जोरात सुरू असून हे काम चुकीच्या पद्धतीने निकृष्ट करत हर घर जल चा उद्देश साध्य होतो की नाही, की या योजनेतून ही भ्रष्टाचाराचे पाणी पाझरणार? हा प्रश्न ग्रामस्थासमोर येत आहे...
ग्रामपंचायत खैरेखुर्दच्या ग्रामसभेत व पत्र व्यवहार करुन देखील सदर कामाचे अंदाजपत्रक आणी ठाराव देण्यास जाणुन बुजून दिरंगाई होत आहे...
तसेच खैरेखुर्द गावातील जुनी पाईप लाईन तोडफोड केल्याने गावात अस्वच्छता असुन दुशीत साठवन पाण्यापासून आरोग्यास घातक परिणाम होण्याची शासन वाटच पाहतो की काय?
पाण्याच्या टाकीचे निकृष्ट दर्जाचे अर्ध्यावर काम असुन सदर कामाची कॉलीट कंट्रोल करुन चौकशीअंत संबंधित ठेकेदार आणी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी याबाबत खैरेखुर्द ग्रामपंचायत च्या दि:०८/२/२०२४ रोजीच्या ग्रामसभेत ठराव करून मा. मुख्य कार्यकारी अधिकारी राजिप अलिबाग यांना पत्र व्यवहार करण्याचे ठराव सर्वांमते मंजूर करण्यात आले होते, तसेच खैरेखुर्द गावाला सदर चे ठराव आणी राजिप अलिबाग येथे खैरेखुर्द ग्रामपंचायत ने केलेल्या पत्राची माहीती ७ दिवसात देण्याचे ही ठरले होते,मात्र ग्रामपंचायत करुन आजतागायत कोणतीच कारवाई करण्यात आली नाही...
सदरील सुरू असलेल्या कामाबाबत संबंधित ठेकेदाराला जमिनीत पाईप टाकण्यासाठी ठरवून दिलेल्या अंतरात जमिनीत पाईप न टाकता काही ठिकाणी मातीआड तर काही ठिकाणी उघडेच ठेवले असुन सदर टाकीचे काम कश्या पध्दतीने होत आहे त्यावरून संबंधित ठेकेदार आणि अभियंता यांची योग्यता दिसुन येत आहे...
तरी खैरेखुर्द ग्रामपंचायत हद्दीतील जलजीवन मिशन योजनेंतर्गत कामांची वरिष्ठांकडून दखल घेऊन संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने खैरेखुर्द ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत जल जीवन मिशनच्या निकृष्ट कामाबाबत संबंधित अधिकारी व ठेकेदार यांची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून सदरचे कामे उत्कृष्ट दर्जाचे होईपर्यंत संबंधित ठेकेदारांचे बिल थांबवण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांमध्ये जोर धरत आहे...
