महाराष्ट्र वेदभुमी

शिवजयंती निमित्त लोणेरे येथील शिवगर्जना प्रतिष्ठान यांचा एकत्रीत एक अनोखा उपक्रम

प्रतिनिधी माणगाव अक्षय कदम 

दरवर्षी प्रमाणे तारखेनुसार व तिथीनुसार होणाऱ्या शिवजयंती ला वेगळाच उत्साह असतो. दरवर्षी हजारोंच्या संख्येने शिवभक्त श्रीमान रायगडावर ज्योत( मशाल) आणण्यासाठी, महाराजांचे दर्शन घेण्यासाठी रायगड किल्याला भेट देत असतात, पंरतु दि. १९ फेब्रु २०२४ रोजी  झालेल्या शिवजयंतीला लोणेरे येथील शिवगर्जना प्रतिष्ठान यांनी युवाशक्ती तसेच शिवप्रेमींनी एकत्रीत येऊन एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला... रायगडावरून ज्योत (मशाल) घेऊन येणाऱ्या सर्व शिवभक्तांची व शिवप्रेमींची चहा, नाश्ता तसेच पाण्याची उत्तम सोय केली... यावेळी गोरेगाव पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक मा.श्री विजय सुर्वे व श्री चव्हाण हे मार्गदर्शनासाठी उपस्थित होते... तसेच शिवजयंतीचे आवचित्त साधून शिवगर्जना प्रतिष्ठानच्या शिवभक्तांनी  माणगाव, दत्तनगर येथील आश्रम शाळेत खाऊ वाटप (बिस्किट पुडे, पाणी) व इतर उपयोगी वस्तूंचे वाटप केले...

 त्यावेळी उपस्थित असलेले शिवभक्त शिवगर्जना प्रतिष्ठानचे संस्थापक- बंटी बामणे, अध्यक्ष -निलेश वाघमारे, उपाध्यक्ष -निकेश करकरे, निखिल जाधव, सचिव-देवांग उतेकर,प्रणय ढेपे तसेच खजिनदार-अंकित भोईर, आशिष जाधव यांच्या सह मदतनिस विवेक उंडरे, निल अली , शंकर वाडकर, प्रतिक केकाणे,रौनक गांधी,प्रतिक ढेपे, पियुष, संजोग उतेकर, प्रथमेश करकरे,सुयोग यादव,आर्यन ढेपे, समर्थ बेंदुगडे,राज ढेपे , सुधीर सोनावणे, रुतेश वाघमारे, सुदेश मनवे ,सिध्देश टेंबे , प्रसाद उभारे ह्या सर्व शिवगर्जना प्रतिष्ठान च्या शिवभक्तांनी युवा पिढीला शिवजयंती अशीही साजरी करता येऊ शकते याचे उत्तम उदाहरण दिले असून सर्व शिवगर्जना प्रतिष्ठानच्या शिवभक्तांनी शिवजयंती दणक्यात साजरी केली...

Post a Comment

Previous Post Next Post