शहानवाज मुकादम/रोहा
मो. 7972420502 (७९२४२०५०२)
रोहा-चणेरा मार्गाचे रुंदीकरण Road widening करताना शेतकर्यांचे खासगी क्षेत्र बाधित होत असल्याने बाधित शेतकर्यांनी विरोध करून काम बंद पाडले Stoped road Works by farmers . याबाबत बाधित शेतकर्यांना कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाही. शेतकर्यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा अथवा शेतकर्यांच्या खासगी क्षेत्रातून रस्ता रुंदीकरण करु नये अशी मागणी शेतकर्यांनी बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे...
रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असताना खाजगी क्षेत्रातून रुंदीकरण होत असल्याचे निदर्शनास येताच शेतकर्यांनी हे काम थांबवले. आमचे खासगी क्षेत्र बाधित न करण्याचा आक्षेप घेत शेतकर्यांनी विरोध केल्याने रुंदीकरणाचे काम थांबविण्यात आले. रुंदीकरणाचे काम शेतकर्यांच्या संमतीशिवाय सुरू केले आहे. तरी सर्व समंधीत शेतकऱ्यांनी आपल्या जागेतून कोणत्या आधारे रस्ता रुंदीकरण केले जाते याची खातरजमा करून घ्यावी.सरकारच्या आदेशाशिवाय खासगी क्षेत्रातून रुंदीकरण होत असून शेतकर्यांना कोणतीही कायदेशीर नोटीस बांधकाम विभागाने दिलेली नाही...
रस्त्याचे रुंदीकरण खाजगी क्षेत्रातून होत असल्याने मोठे क्षेत्र बाधित होत असल्याचे शेतकर्यांनी निवेदनात म्हटले आहे. शेतकर्यांना यासाठी कोणताही मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे शेतकर्यांनी सार्वजिनिक बांधकाम विभागासह जिल्हाधिकार्यांना निवेदन पाठवले आहे...
निवदेनावर रघुनाथ गणपत कडू,मधुकर गणपत कडू, श्रीमती प्रमिला प्रकाश कडू, यशवंत गणपत कडू, श्रीमती ललिता दत्तात्रेय कडू,नमुबाई वासुदेव नाईक, प्रशांत प्रकाश कडू, निलेश दत्तात्रेय कडू, सौ.उन्नती उदय महाडिक या शेतकर्यांच्या सह्या आहेत...
यांच्या निवेदनानुसार काम तेथील केलेले नसले तरी मोठ्या चलाखीने व समंधीत शेतकऱ्यांना अंधारात ठेवून, बांधकाम विभागाच्या ठेकेदाराने काही शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची पुर्व सुचना न देता रस्ता रुंदीकरण करुन आपली कामांची बिले घेतली आहेस या मुळे परिसरातील शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झाली आहे...
त्यातच GSW सालाव या कंपनची नवीन मोठी लोखंडी लाईन याच रस्त्याने खोदाई चालू आहे तसेच BSNLकंपनीची केबल लाईन देखील याच रस्त्याच्या कडेने बेबंदशाही शाहीने चालू आहे...
अशा योजनांमध्ये शेतकऱ्यांची भरमसाठ जागा फुकट लाटत आहेत हे काम नेमके कोणाच्या आदेशानुसार चालू आहे याची खातरजमा करून शेतकऱ्यांनी घ्यायला हवी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चालू आहे त्याचे रुंदीकरण झाले परंतु तेथील शेतकऱ्यांनी आपल्या जागेचा मोबदला सरकारकडून मिळवला मग रोहा चणेरा खाजगी मालकी जागेचा मोबदला शेतकऱ्यांना देऊ केला का...?
भौगोलिकदृष्ट्या या परिसरात शेतकऱ्यांकडे तुटपुंज्या जागा आता शिल्लक उरली आहे... रोडटच जागेला भविष्यात खुपमोठी किंमत असतांना याचा विचार शेतकरी कधी करणार..?
सुविधा नको कोणाला आहे,पण शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खाऊन सुविधा होत असेल तर ती अन्याय कारक आहे.याचा गांभिर्य लक्षात घेऊन राज्य कर्त्यांनी, लोकप्रतिनिधी,तसेच सरपंच गाव पुढारी यांच्या लक्षात आणून देत आहोत की कुठचाही शेतमालक असो त्याला त्याच्या हक्काच्या तुकड्याचा मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा ही आपणास सर्व पिडीत शेतकऱ्यांकडून विनंती आहे...?
आता तर रोहा पासून दोन्ही तिरावरील गावातून २६ गाव पाणी पुरवठा योजना करोडोंची आहे.त्याकरीता पाईपलाईनचे काम युद्धपातळीवर चालू आहे.यांनीतर बेबंदशाहीने आधी गावांतील सुंदर रस्ते फोडून माती केली आता रोहा पासून रस्ताने लाईनचे काम चालू केले आहे कुणाबरोबर मिटींग घेतल्या याचा थानपत्ता दिला का..?
तसेच मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करून कंपाऊंड चालू आहे याचा तपशील कोणी का घेत नाही...जागा कोणाची लावतोय कोण आदेश कोणी दिला सगळा कसा "भगवान तेरे आंधे भक्त" या हिशोबात चालले आहे ...उठ शेतकऱ्या आता तरी जागा हो...
या सर्व प्रकारावर प्रकाश टाकून थोडा विचार करावा हिच मापक अपेक्षा माहिती अधिकार रायगड जिल्हा अध्यक्ष रघुनाथ कडु यांनी केली...

.jpg)