सोगाव - अब्दुल सोगावकर :
रात्रीच्या भव्य प्रकाशझोतातील दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन,
अलिबाग तालुक्यातीलच नव्हे तर रायगड जिल्ह्यातील प्रमुख आकर्षण असलेल्या व चतुर चातकाप्रमाणे आतुरतेने वाट पाहत असणाऱ्या क्रिकेट खेळाडू व क्रिकेट रसिकांना भव्य रात्रीच्या प्रकाशझोतातील दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे सोगाव क्रिकेट मैदान येथे अलिशान सोगाव क्रिकेट क्लब तर्फे 'अलिशान कप २०२४' या स्पर्धेचे पर्व ११ वे मर्यादित षटकांचे ओव्हरआर्म टेनिस क्रिकेट स्पर्धांचे आज शुक्रवार दि. २ व शनिवार दि. ३ फेब्रुवारी २०२४ रोजी दोन दिवस भव्य क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे...
या अलिशान कप क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार दि.२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता सोगाव क्रिकेट मैदानात रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव प्रविण दादा ठाकूर यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुनिल थळे, रायगड जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष अखलाख शिलोत्री, अलिबाग तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष भास्करराव चव्हाण उपस्थित राहणार आहेत. तसेच माजी रा. जि. प. पक्षप्रतोद काका ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेस सेवा फाउंडेशन अध्यक्ष उमेश ठाकूर, आवास सरपंच अभिजित राणे, समीर ठाकूर, रविंद्र(नाना) ठाकूर, आगरसुरे सरपंच जगन्नाथ पेढवी, आमिर ठाकूर, मापगाव माजी उपसरपंच समद कुर, सातिर्जे माजी सरपंच प्राची ठाकूर, मापगाव सरपंच उनीता थळे, मापगाव उपसरपंच अनिता शिंदे, मापगाव ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत खोत, किशोर सातमकर, प्राजक्ता जाधव, सानिका घाडी, अनिल जाधव, सूचित थळे, नितीन अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी, सुरेश राऊत व इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यावेळी पंचक्रोशीतील प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत... हे सामने पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींची मोठी गर्दी होणार असल्याने मंडळाने त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे, तसेच या क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी जास्तीत जास्त क्रिकेट प्रेमी व रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अलिशान सोगाव अध्यक्ष लाईक कप्तान यांनी केले आहे. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अलिशान सोगाव मंडळाचे कार्यकर्ते मेहनत घेत आहेत...
