अब्दुल सोगावकर:अलिबाग
सोगाव :गेल्या ५३ दिवसांपासून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपामुळे बंद असलेल्या अंगणवाड्यांमध्ये शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे संप मिटल्यामुळे पुन्हा एकदा अंगणवाडीतील शाळेत किलबिलाट सुरु झाला आहे. यामुळे लहान मुलांमध्ये व त्यांच्या पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे...
अंगणवाडी हि शिक्षणाची पहिली पायरी आहे... याची जाणीव ठेवून मूनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी सोगाव येथील उर्दु व मराठी अंगणवाडीतील मुलांना शाळेत जाऊन खाऊचे वाटप करत मुलांचे स्वागत केले आहे... यावेळी सचिन घाडी यांच्यासोबत सचिन घाडी मित्रमंडळाचे कार्यकर्ते रोशन अनमाने, रोशन पुजारी, प्रतिक अनमाने, प्रशांत अनमाने, प्रतीक पाटील, साहिल कुर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासोबतच ३ वर्षे ते ६ वर्षे वयोगटातील मुले, मुली, त्यांचे पालक, अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होते....
फोटो लाईन : अंगणवाडीमध्ये पुन्हा एकदा किलबिलाट सुरू झाल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी लहान मुलांना खाऊचे वाटप करत स्वागत करतांना उपस्थित मित्रपरिवार,

