शहानवाज मुकादम/रोहा
दि:२४/२/२०२४ शनिवार रोजी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक उर्दु शाळा खैरेखुर्द मध्ये विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम सोहळा आयोजित करण्यात आले होते,
या शाळेत ईयत्ता १ली ते ७ वी पर्यंत चा वर्ग आसुन या कार्यक्रमास यशस्वी होण्यास शाळेचे शिक्षक वर्ग नजमा मॅडम,फकीर सर,शिक्षण प्रेमी सामीद शेख,बुशरा धनसे आणि मुख्याध्यापक तारीख सर, शाळा व्यवस्थापन समीती सदस्या शाहीन धनसे, नाजीया मुकादम,सना धनसे,जमीला मुकादम, रिजवान खोत, मुख्तार धनसे व समीती चे अध्यक्ष अ.हमीद गिते आणि पालकवर्गाणी खुप मेहनत घेतली होती...
शाळेतील विद्यार्थ्यांकडून वेगवेगळे मनोरंजन करून गावाची स्वच्छता, सुंदरता, आरोग्य, हागणदारीमुक्त प्लास्टिक बंदी आणि शिक्षणाची कमी या विषयावर सरपंच, डॉक्टर,आणि शिक्षकाचे कर्तव्य काय असते हे आज विद्यार्थ्यांकडून या कार्यक्रमात दाखवून दिले...
शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते लियाखत भाई खोत यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवत त्यांना शुभेच्छा व विद्यार्थी सरपंच यांना बक्षीस ही दिले...
या कार्यक्रमात अनेकानी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकवर्गाचे मनोबल वाढवत व गुणगौरव करणारे भाषण देण्यात आले, या कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीतानी करण्यात आला...

