उरण दि २५(विठ्ठल ममताबादे)
रयतच्या माजी विद्यार्थिनीची दापोली विद्यालयासाठी भरीव मदत
दापोली हायस्कूलची माजी विद्यार्थिनी शुभांगीताई महेंद्रशेठ घरत यांचे १९९० साली दहावीपर्यंतचे शिक्षण याच हायस्कूलमध्ये झाले... रयतच्या सर्व हायस्कूलचे नुतनीकरण झाले मात्र दापोली - पारगाव हायस्कूलची इमारत जुनीच होती याची खंत जाता-येता इमारत पाहताना शुभांगीताईना होती...म्हणून शाळा व्यवस्थापनाने नवीन इमारतीचा घाट घातल्यानंतर शुभांगीताईनी आपले पती कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचा आदर्श घेत पुढे येऊन आपल्या विद्यालयाची इमारत लवकरात लवकर पूर्ण व्हावी म्हणून २४ वर्षानंतर स्वतः विद्यालयात येऊन पंचवीस लाखाचा धनादेश शाळा व्यवस्थापणाकडे सुपूर्द केला...
