महाराष्ट्र वेदभुमी

निवडणूक आयोगामार्फत ईव्हीएम मशीन बाबतीत किहीम येथे जनजागृती,



सोगाव ,अलिबाग (अब्दुल सोगावकर )

जनजागृती कार्यक्रमाला किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांची उपस्थिती,

गेल्या काही दिवसांपासून ईव्हीएम मशीन बाबतीत मतदार संभ्रमात आहेत, आपण दिलेले मत प्रत्यक्षात त्याच उमेदवाराला दिले आहे की नाही याबाबत समाजमध्यमांमध्ये समज गैरसमज पसरले आहे...


   या गैरसमजुती बाबतीत निवडणूक आयोगाच्या फिरत्या वाहनाद्वारे गावोगावी जाऊन जनजागृती करण्यात येत आहे, हे फिरते वाहन किहीम ग्रामपंचायत हद्दीत जनजागृती करण्यासाठी आले असता किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी स्वागत करत नागरिकांसोबत ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट मशीन बाबतीत माहिती घेतली...


यावेळी किहीम ग्रामपंचायत उपसरपंच मिलिंद पडवळ, सदस्य दिनेश सोष्टे, संतोष किर, सदस्या निधी काठे, कल्पिता आमले, जागृती झेरंडे, स्नेहा आर्ते, ग्रामसेवक बाबुराव वनवे, तलाठी संतोष शिंगडे, पोलीस नाईक तसेच पंचक्रोशीतील महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते...

फोटो लाईन : निवडणूक आयोगामार्फत ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट बाबतीत जनजागृती कार्यक्रमात उपस्थित किहीम सरपंच पिंट्या गायकवाड व उपस्थित ग्रामस्थ,

Post a Comment

Previous Post Next Post