महाराष्ट्र वेदभुमी

अनोळखी इसमास ओळखत असल्यास रोहा पोलीस ठाण्यात संपर्क साधावा..


दूरध्वनी क्रमांक:०२१९४-२३४९३३,

पो.ना.केजी बेल्हेकर मो.नं.८०८७६७१८९८...

शहानवाज मुकादम/रोहा

मो.७९७२४२०५०२

रोहा:(दि:०१ मार्च २०२४) तालुक्यातील खारी गावचे हद्दीतील रोहा-चणेरा रोड लगत गीताई धाब्याजवळ शेतात अनोळखी (पुरुष) इसम बेशुद्ध अवस्थेत आढळून आला...

"रोहा पोलीसांकडून नातेवाईकांचे शोध सुरु"

 या छायाचित्रातील अनोळखी इसमास कोणी ओळखत असं असल्यास वरील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन रोहा पोलीसांकडून करण्यात येत आहे...

 सदर इसमाची उंची-१६५ सेमी, बांधा-सडपातळ, वर्ण-सावळा,केस काळे सफेद,दाढी सफेद, डोळे-अर्धवट उघडे, नाक सरळ,गळ्यात केशरी रंगाचा धागा,नेसुस काळ्या रंगाची फुल पॅन्ट,अशा वर्णनाचा असून त्याचे नातेवाईकांचा शोध घेऊन मिळुन आल्यास संपर्क साधावा...

 दि:२१/०२/२०२४ रोजी अनोळखी (पुरुष) इसम वय अंदाजे ४० ते ४५ वर्ष बेशुद्ध अवस्थेत आढळून आला असून त्यास उपचाराकरीता उप जिल्हा रुग्णालय रोहा येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून सदर इसमास मृत घोषित केले...

सदर विषयी रोहा पोलीस ठाण्यात अ.मृ.र.नं.०६/२०२४ सीआरपीसी १७४ प्रमाणे दि:२१/०२/२०२४ रोजी१७.५२ अन्वये दाखल आहे...

 तरी सदर अनोळखी इसमाचे नाव गाव नातेवाईक यांची ओळख असल्यास रोहा पोलीस ठाण्यात वरील क्रमांकावर संपर्क साधण्यात यावे असे आवाहन रोहा पोलिसांकडून करण्यात येत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post