अलिबाग (ओमकार नागावकर) :
चौल ग्रामपंचायतीचा गावाच्या विकासासाठी कामाचा सपाटा सुरूच असुन दि.२९ फेब्रुवारी रोजी चौल कुंडेश्र्वर अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला... माजी रायगड जिल्हापरीषद विरोधी पक्षनेते सुरेंद्रदादा म्हात्रे यांच्या विकास निधीतून रायगड जिल्हापरिषद सेस योजने अंतर्गत सुमारे ६ लाख ९९ हजार रुपयेचा निधी चौल कुंडेश्वर अंतर्गत रस्त्यासाठी मंजुर करण्यात आला आहे... मंजुर केलेल्या निधीतून ४०० मीटर अंतर रस्ता करण्यात येणार आहे...
चौल ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक विकास कामे चौल गावासाठी करण्यात आली असून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी गावासाठी अनेकदा निधी प्राप्त करून गावाची विकास कामे केली आहेत... या कुंडेश्र्वर अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, सरपंच प्रतिभा पवार, उपसरपंच अजित गुरव, ग्रामपंचायत सदस्य अतुल वर्तक, मारूती भगत, सुधीर नाईक, दत्ता अधिकारी, दिपक मळेकर, नरेश भोईर, कल्याणी बाजी, माधवी टेकाळकर व चौल कुंडेश्वर येथील ग्रामस्थ उपस्थित होते...