सोगाव अलिबाग :अब्दुल सोगावकर
अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील कु. सिद्धी शाम वाकडे हिने मुंबई (दादर) येथे २४ फेब्रुवारी २०२४ रोजी लोकमत सखी मंच तर्फे आयोजित झालेल्या कार्यक्रमात ज्योवीस संक्रांत क्वीन पर्व ६ व्या सौंदर्य स्पर्धेत महाराष्ट्रातील प्रमुख ५० सौंदर्यवतींमधून निवड होत प्रथम क्रमांक मिळविले आहे... यावेळी कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते तिचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला...
रायगड जिल्ह्यासह अलिबाग तालुक्यातील चोंढी गावाचे नाव उज्वल केल्याबद्दल किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी बुधवार दि.२८ फेब्रुवारी २०२४ रोजी संध्याकाळी कु. सिद्धी वाकडे हिच्या चोंढी निवासस्थानी पत्नी प्रिती गायकवाड व त्यांचे सहकारी डॉ. किरण शेट्ये, नदीम आत्तार, विजय मोरे यांच्यासह जाऊन कौतुक करत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. यावेळी सिद्धी वाकडे हिची आई संध्या वाकडे आणि वडील शाम वाकडे उपस्थित होते...
कु. सिद्धी वाकडे हिने पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा पॅकेजिंग हे शिक्षण पूर्ण केले आहे. ती एक उत्कृष्ट योगा व झुंबा शिक्षक तसेच उत्कृष्ट नृत्यांगना आणि कोरिओग्राफर असून ती आपल्या निवासस्थानी ३ वर्षांपासून योगा शिकविण्याचे प्रशिक्षण देत आहे, या योगा शिकविण्याचे प्रशिक्षण तिने मिनिस्ट्री आयुष सरकार मार्फत घेऊन तिने आतापर्यंत १५० पेक्षा जास्त मुलामुलींना योगाचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच अलिबाग येथे मनःशांतीसाठी आलेल्या पर्यटकांना त्यांच्या मागणीनुसार त्या त्या ठिकाणी जाऊन योगाचे प्रशिक्षण देत आहे...
येत्या काळात पुणे व महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणार असल्याने यासाठी आपल्या सर्वांचा आशीर्वाद व शुभेच्छा हव्यात, असे सिद्धी वाकडे हिने बोलताना सांगितले आहे...
फोटो लाईन : मुंबई येथे झालेल्या लोकमत सखी मंच तर्फे आयोजित कार्यक्रमात ज्योवीस संक्रांत क्वीन पर्व ६ सौंदर्यस्पर्धेत चोंढी येथील कु. सिद्धी शाम वाकडे हिने प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल तिचा सत्कार करताना किहीम सरपंच पिंट्या गायकवाड व उपस्थित मान्यवर,