अब्दुल सोगावकार अलिबाग
सोगाव : गेल्या ५३ दिवसांपासून महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता, याबाबत संपकाळात अनेक वेळा मंत्री महोदयांना निवेदन देण्यात आले होते, यावेळी उडवाउडवीची उत्तरे देऊन मागण्या मान्य करण्यात येतील, असे सांगितले जात होते. मात्र ठोस निर्णय न घेता केवळ आश्वासन दिले गेले. म्हणून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला होता...
२६ जानेवारीच्या पूर्वसंध्येला अंगणवाडी कृती समितीच्या बैठकीत काही प्रमाणात मागण्या मान्य केल्याचे जाहीर केले तर इतर मागण्या लवकरच पूर्ण करणार असल्याचे कृती समितीला सांगण्यात आले आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी संघटनेच्या वतीने संप मागे असल्याचे सांगितले...
शुक्रवार दि. २६ जानेवारी रोजी महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे जिल्हा पोलिस मुख्यालयात ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित होत्या, त्यावेळी आदितीताई तटकरे यांच्या हस्ते अलिबाग तालुक्यातील सुमारे ५० अंगणवाडी सेविका यांना पोषण ट्रॅकर ऍपद्वारे दर महिन्याला ० ते ६ वर्ष मुलांची मोबाईल वर ऑनलाइन माहिती भरण्यासाठी आवश्यक असलेल्या मोबाईल फोनचे वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याबद्दल अंगणवाडी सेविकांनी मंत्री महोदयांचे आभार मानले...
यावेळी महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा.निर्मला कुचिक मॅडम , प्रकल्प अधिकारी मा .गीतांजली पाटील मॅडम तसेच शिंदे मॅडम व विजय मयेकर विस्तार अधिकारी व अलिबाग प्रकल्पातील सुपरवायझर विनोदिनी मोकल, दीप्ती मोकल, सामिया पेरेकर, उल्का कुलकर्णी, भाग्यश्री पाटील व अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या...
फोटो लाईन : प्रजासत्ताक दिनी अंगणवाडी सेविकांना ऑनलाइन कामकाजासाठी उपयुक्त असणारे मोबाईल फोनचे वाटप करताना महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे व उपस्थित अंगणवाडी सेविका व उपस्थित मान्यवर
