महाराष्ट्र वेदभुमी

रायगड केसरी बैलगाडी शर्यतीचा किताब लवकरच रोहा तालुक्यात आ.अनिकेत तटकरे यांचे प्रतिपादन


कोलाड (श्याम लोखंडे / नंदकुमार कळमकर) 

गोवे येथील बैल गाडी शर्यत राज गोवर्धने यांच्या बैल जोडीने जिंकली.

रोहा तालुक्यात कबड्डी क्रिकेट खेळला अधिक महत्त्व परंतु त्या पलिकडे जाऊन येथील हैशी बैल गाडी मालक आता अलिबाग मुरुड प्रमाणेच तालुक्यात बैल गाड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात येत आहेत गोवे गाव तसेच कोलाड विभागातील युवकांचे प्रेरणास्थान असलेले युवा कार्यकर्ते नरेंद्र जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त नेहमी कबड्डी अथवा क्रिकेट खेळाचे सामने खेळले जातात परंतु २६ जानेवारी रोजी वाढदिवसानिमित्त तसेच प्रजाकसत्ताक दिनाचे औचित्य साधून एक आगळा वेगळा बैल गाडी शर्यतींची भव्य अशी स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचा आनंद व्यक्त करत रोहा तालुक्यात रायगड केसरी बैल गाडी शर्यतीचा किताब लवकरच रोहा तालुक्यात भरविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन आ.अनिकेत तटकरे यांनी करत हौशी बैल गाडी शर्यत स्पर्धकांना आश्र्वासित करून हौशी बैल गाडी मालक तसेच आयोजकांचे सर्वांचे अभिनंदन केले...

हौशी बैल गाडी शर्यत गोवे रोहा यांच्या वतीने भव्य जिल्हा स्तरीय गोवे माती बंदर येथे शुक्रवारी २६ जानेवारी रोजी रायगड जिल्हा स्तरीय बैलगाडी ( छकडा ) जंगी शर्यतींचे आयोजन केले होते ...यावेळी आ. अनिकेत तटकरे बोलत होते...या स्पर्ध्येत रोहा तालुक्यातील अष्टमी येथील गाडी मालक राज गोवर्धने यांची बैलगाडी अंतिम फेरीत प्रथम तर सेमी फायनल मध्ये संदेश भोईर देवकान्हे यांची बैल गाडी प्रथम आली असून स्पर्धेत विजयी होणाऱ्या गाडी मालकाना आ. अनिकेत तटकरे तसेच नरेंद्र शेठ जाधव यांच्या शुभहस्ते पारितोषिक देऊन त्यांचा हौशी बैल गाडी शर्यत , जय हनुमान क्रिडा मंडळ व ग्रामस्थ गोवे यांच्या वतीने यांच्या हस्ते सन्मान करण्यात आले...

रायगड जिल्हा स्तरीय रोहा तालुक्यात मौजे गोवे माती बंदरावर रंगलेल्या बैल गाड्यांच्या शर्यतीचा थरार पुन्हा हौशी रसिक प्रेक्षकांना पहावयास मिळाला तर उत्स्फुर्तपणे प्रतिसाद लाभलेल्या रोहा तालुक्यातील हौशी बैल गाडी शर्यत गोवे येथील स्पर्धेत जवळपास शंभरहून अधिक बैल गाड्या सहभागी झाल्या होत्या गोवे ग्राम पंचायतीचे उपसरपंच नितीन जाधव व जय हनुमान क्रिडा मंडळ ग्रामस्थ गोवे ,तसेच हौशी बैलगाडी मालक यांच्या संयुक्त विद्यमनाने युवकांचे प्रेरणास्थान व राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गट कोलाड विभागीय अध्यक्ष नरेंद्र शेठ जाधव यांच्या वाढिवसानिमित्त व प्रजाकसत्ताक दिनाचे औचित्य साधून या जंगी बैलगाडी शर्यती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. तर सदरच्या आयोजित केलेल्या या बैलगाडी शर्यतीला फायनल गटातून प्रथम राज गोवर्धने अष्टमी रोहा यांच्या बैल गाड्यांनी सरसी मारली तर द्वितीय आदेश कार्लेकर कुरुल,आणि संतोष गायकर यांची गाडी तृतीय  आली तर सेमिफायनल मध्ये प्रथम संदेश भोईर, द्वितीय दावीद, तृतीय वेद गोगले,यांच्या बैलगाडीने ही शर्यत जिंकली आहे....

गोवे माती बंदरावर रंगलेल्या नावीन्य पूर्ण बैल गाड्यांचा थरार पाहण्यासाठी हजोरोंच्या संख्येने हौशी रसिक यांनी एकच गर्दी केली होती.तर स्पर्ध्येत सहभागी झालेल्या शंभरहून अधिक बैल गाड्यांच्या माध्यमातुन एकुण दहा गटातून सोडण्यात आलेल्या बैलगाडी शर्यत मध्ये कॉटर फायनल मध्ये प्रकाश वरणकर, पार्थ जाधव स्वप्नील ठाकूर द्वितीय, अनुश्री धुमाळ तृतीय,तर गट क्रमांक एक मधून ओम जाधव प्रथम , रणजित म्हसकर द्वितीय, अक्षय जाधव तृतीय,गट क्रमांक दोन मधून बाळू आगळे प्रथम, चैतन्य आंब्रुस्कर द्वितीय , आशिष सुभेकर तृतीय,गट क्रमांक तीन मधून राहुल बामुगडे प्रथम ,विराज पाटील द्वितीय, अजय पाटील तृतीय,यांच्या बैलगाड्यानी शर्यत जिंकली त्याच बरोबर अतिशय रंगदार आणि मजेदार शर्यतीचा आनंद रसिक प्रेक्षकांना मिळाला तो म्हणजे गट क्रमांक चार ते सात यामध्ये गट क्रमांक चार मध्ये ऋतुजा तांबडकर, कौशल मोंडे, आकाश ठाकूर , पाच मधून गणेश सुतार, शरद म्हात्रे, मैत्री ग्रुप, सहा मधुन अमिषा पाटील, सर्वेश खेडकर , महिमा झेडेकर,सात मधून पूर्वेश सावंत, साहिल कळव , स्वप्नील भोईर, यांच्या बैल गाडी जोडीने रंगत दाखवत बाजी मारली.तर शर्यतीचा विशेष कौतुक तसेच गुणगौरव म्हणुन गावातील हौशी बैल गाड्या मालकांनी देखील रसिक प्रेक्षकांना आपल्या बैल गाड्यांच्या रंगत दाखवत शुभारंभाला शर्यत स्पर्धकांना एक वेगळा आनंद दिला यात हौशी बैल गाडी मालक चंद्रकांत पवार, दिनकर दहिंबेकर,दिलीप आंबेकर यांच्या गाड्यांनी हि शर्यत जिंकली आणि रसिक प्रेक्षकांचा एकच टाळ्यांचा गजर झाल्याचे पहावयास मिळाले...

तसेच या शर्यतीत बैल गाड्यांचे एकूण सात गट अधिक कॉटर फायनल आणि फायनल चे गट असे एकुण दहा गट तयार करण्यात आले होते तर शर्यतीत सर्वांच्या नजरा लागलेल्या अंतिम फेरीत भुर्रर्र गाडीचा धुरळा उडवत व रंगतदार थरार दाखवत राज गोवर्धने अष्टमी रोहा यांनी फायनलची शर्यत जिंकली, तर आदेश कार्लेकर व्दितीय ,आणि संतोष गायकर यांच्या बैलगाडी जोडीने अंतिम फेरीतील तिसरा  क्रमांक पार करत हे विजेतेपद पटकावले...

हौशी बैल गाडी शर्यत उप सरपंच नितिन जाधव जय हनुमान क्रिडा मंडळ व ग्रामस्थ गोवे  यांनी आयोजित केलेल्या गोवे माती बंदरावर येथील हौशी ग्रामस्थ व बैलगाडी हौशी नागरिकांनी या स्पर्धांचे आयोजन केले होते याला हौशी रसिकप्रेशकांनी भरभरून प्रतिसाद देत याचा आनंद लुटला तर उस्पुर्त प्रतिसाद लाभलेल्या या शर्यतींचा शुभारंभ युवकांचे प्रेरणास्थान तथा गोवे ग्राम पंचायतीचे सरपंच व नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब चे अध्यक्ष महेंद्रशेठ पोटफोडे यांच्या हस्ते करण्यात आले.. यावेळी नरेंद्र पवार, प्रकाश थिटे, विजय पवार,उपसरपंच सौ रंजिता जाधव,नितीन जाधव, कमलाकर शिर्के,बळीराम जाधव,बि एस भोसले,विजय पवार, सुभाष वाफिलकर आदी हौशी बैल गाडी स्पर्धक ग्रामस्थ तसेच हौशी रसिक प्रेक्षक बहुसंख्येने उपस्थीत होते...

तर नरेन्द्र शेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त गोवे माती बंदरावर रंगतदार बैल गाड्या शर्यतींचा थरारचे बक्षिस वितरण आ.अनिकेत तटकरे, सुरेश महाबळे, जयवंत मुंडे, राकेश शिंदे, धनावडे,यांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात आले.तर उत्तम समालोचन निलेश जाधव आणि अमित घरट यांनी केले तसेच उपस्थीत मान्यवरांचे स्वागत आयोजक उपसरपंच नितीन जाधव यांनी केले तसेच या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी हौशी बैल गाडी शर्यत जय हनुमान क्रिडा मंडळ व ग्रामस्थ गोवे यांनी अथक परिश्रम घेतले...

Post a Comment

Previous Post Next Post