अब्दुल सोगावाकर : अलिबाग
एकात्मिक बाल विकास योजनेच्या माध्यमातून
सोगाव :स्तनदा मातांना लहान शिशुची काळजी घेण्यासाठी एकात्मिक बाल विकास योजना अंतर्गत बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या हस्ते स्तनदा मातेला हायफोथार्मिया किट चे वाटप करण्यात आले. या किट मधिल जे साहित्य असते त्यामुळे नवजात शिशूच्या आरोग्याची काळजी घेतली जाते व त्यामुळे नवजात शिशुंचे कुपोषण व अर्भक मृत्यूचा धोका टाळण्यासाठी मदत होते...
शुक्रवार दि. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मंत्री आदितीताई तटकरे अलिबाग जिल्हा पोलिस मुख्यालय येथे ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित होते, त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात प्रत्येक स्तनदा मातांना यापुढे हायफोथार्मिया किट चे वाटप करण्यात येणार असल्याबद्दल हायफोथार्मिया किटचे वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले...
यावेळी महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा.निर्मला कुचिक मॅडम,प्रकल्प अधिकारी मा.गीतांजली पाटील मॅडम तसेच शिंदे मॅडम व विजय मयेकर विस्तार अधिकारी व अलिबाग प्रकल्पातील सुपरवायझर विनोदिनी मोकल, दीप्ती मोकल, सामिया पेरेकर, उल्का कुलकर्णी, भाग्यश्री पाटील व अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या...
*फोटो लाईन :* स्तनदा मातांना हायफोथार्मिया किटचे वाटप करताना मंत्री आदितीताई तटकरे व उपस्थित मान्यवर,
