अलिबाग (ओमकार नागावकर) :
गुरुवार दि. १ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा होणारा जनसंवाद दौरा निमित्त २७ जानेवारी रोजी श्री. संदीप पालकर यांचे जनार्दन हॉलिडे होम, चेंढरे बायपास अलिबाग येथे शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रदादा म्हात्रे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पत्रकार परिषद संपन्न झाली...
सभेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे कष्टकरी, शेतकरी, नागरीक व शिवसैनीकांशी संवाद साधणार असून त्यांचा दौरा दि.१ व २ फेब्रुवारी २०२४ रोजी संपुर्ण रायगड जिल्ह्यात होणार आहे. दि.१, सुमारे ११.०० वाजता पेण येथील प्रायव्हेट हायस्कूल जवळ प्रथम, तर दृतिय सभा दुपारी ३.०० रोजी अलिबाग तालुक्यातील चौल पिरांचे देऊळ येथे होणार आहे... तृतीय रोहा एम.आय.डी.सी बायपास रोड उरूस मैदान येथे सभा होणार आहे... तसेच दि.२ रोजी ११.०० वा. पोलादपुर शहर श्री.काळभैरवनाथ सहान येथे सभा व दुपारी ३.०० वा. म्हसळा शहर दिघी रोड येथे सभा, सायं ६.०० वा. माणगांव मोरबा रोड ग्राउंड माणगांव येथे सभा होणार असल्याचा नियोजित दौरा माहिती जिल्हाप्रमुख सुरेंद्रदादा म्हात्रे यांनी दिली...
यावेळी शंकर गुरव अलिबाग तालुकाप्रमुख, जिल्हा सल्लागार सतीश पाटील, अलिबाग शहर प्रमुख संदीप पालकर, विधानसभा संघटक कृष्णा कडवे, उपजिल्हा संघटक अजित पाटील, अलिबाग उपतालुका प्रमुख कैलास गजने, थळ विभाग प्रमुख रूपेश जामकर, कमलेश खरवले, युवासेना तालुका अधिकारी मंदार नाईक, विधानसभा समन्वयक प्रणव म्हात्रे, महिला आघाडीच्या सहसंपर्क संघटिका शिल्पा घरत, तनुजा पेरेकर, तालुका संघटिका स्नेहल देवळेकर, उपतालुका संघटिका शितल पेडणेकर, शहर संघटिका राखी खरवले व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते...
अलिबाग तालुक्यातील चौल पिरांचे देऊळ येथील सभेसाठी ४० हजार फूट जागेची सोय केली असून १० हजाराहून अधिक शिवसैनिक या सभेसाठी उपस्थित राहतील, जनतेला शिवसैनिकांना उनाचा त्रास होवू नये याकरिता संपूर्ण मंडप टाकण्यात येणार आहे... रस्त्या वाहतूक कोंडी होवू नये याकरिता काही अंतरावर गाड्यांची पार्किंग व्यवस्था देखील करण्यात येणार आहे.... पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे जनतेला संबोधित करतील, त्यांचे विचार पक्ष बांधणी करण्याचे धोरण सांगतील आणि त्यांना ऐकण्यासाठी आम्ही सर्व आतुर आहोत असे जिल्हा प्रमुखांनी सांगितले. तरी आपण या सभेला आपल्या सहकाऱ्यासंह विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित रहावे ही विनंती त्यावेळी केली...
