महाराष्ट्र वेदभुमी

सोगांव येथे उर्दू व मराठी शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा



अब्दुल सोगवाकर

सोगाव : भारताचा  प्रजासत्ताक दिनाच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त अलिबाग तालुक्यातील सोगाव येथील राजिप उर्दु, उर्दू हायस्कूल व राजिप मराठी शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला...

         सकाळी एकत्रित काढलेल्या प्रभातफेरी मध्ये तिन्ही शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक सहभागी झाले होते. नंतर प्रत्येक शाळेतील पटांगणावर मुख्याध्यापक यांनी ध्वजारोहण केले, यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली, या कार्यक्रमाला सोगाव पंचक्रोशीतील मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना व उपस्थितांना खाऊ वाटप करण्यात आले...

     यावेळी तिन्ही शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, सोगाव, मूनवली, चोरोंडे पंचक्रोशीतील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते...

फोटो लाईन :  राजिप उर्दू शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण झाल्यानंतर प्रतिज्ञा घेताना विद्यार्थी व उपस्थित शिक्षक, मुख्याध्यापिका व मान्यवर ग्रामस्थ,

Post a Comment

Previous Post Next Post