महाराष्ट्र वेदभुमी

रा.जि.प.शाळा कामथ येथे ७५वा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा

अलिबाग (सचिन पाटील)

  रोहा तालुक्यातील  रा.जि.प शाळा कामथ येथे ७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी सौ.हौशीताई अशोक वाघमारे यांच्या हस्ते शाळेतील ध्वजारोहण करण्यात आले... शाळेतील विद्यार्थ्यांनी गायलेल्या सुंदर अशा स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.अंजली अरविंद गुंजोटे यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत शाळेच्या वार्षिक घडामोडींना उजाळा दिला...

  शाळेत विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक गाण्यावर सुंदर असे नृत्य सादर करून आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले सहभागी विद्यार्थी निधी संजय सुतार इ.४थी, राज संजय निळेकर इ.४थी, अनुज अशोक वाघमारे इ.३री, चंद्रकांत सखाराम पवार इ.३री, सिद्धी संजय वाघमारे इ.३री, ममता नरेश हिलम इ.३री, प्रियंका दिलीप पवार इ.३री, युवराज संजय निळेकर इ.३री, प्रेम सचिन वाघमारे इ.२री, नीरज संजय सुतार इ.१ ली, अमेय आनंद सानप इ.१ ली या विद्यार्थ्यांनी कोळीगीत, देशभक्तीपर गीत, बम बम बोले, माय भवानी, बहिण भाऊ नातं इ. गाण्यावर नृत्य सादर केले...

मान्यवरांच्या मनोगतानंतर  युवराजने भाषण, निधीने देशभक्तीपर कविता व राजने मोबाईलचे दुष्परिणाम यावर एकांकिका सादर केली...

      अंगणवाडी सेविका सौ. संजना सानप, माजी विद्यार्थीनी प्रतिभा निळेकर,योगिता निळेकर यांनी तांदळापासून काढलेली आकर्षक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधत होती...

     कार्यक्रमाचे औचित्य साधून गावातील ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांना बिस्कीट पुडे, चॉकलेट आदि खाऊ वाटप केले...

कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक,पालक वर्ग,तरुण मंडळी, तसेच ग्रामस्थ बंधु भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते...

 

Post a Comment

Previous Post Next Post