केळवणे २८ जाने.(अजय शिवकर)
महाराष्ट्र हे अनेक कलागुणांनी संपन्न असे महान राज्य ...आणि ते कलागुण जास्तीतजास्त संपन्न व्हावे त्यासाठी अनेक गावांतील संस्था किंवा ग्रुप प्रयत्नशील असतात... हे सुद्धा एक प्रकारचे समाजकार्यच आहे...
अशाच प्रकारचे शिवरायांच्या भूमीतील केळवणे गाव येथील एक स्वरगंध ग्रुप नेहमी प्रयत्नशील असते...
त्यांच्या याच प्रयत्नाने शनिवार २७ जानेवारी या दिवशी केळवणे गावच्या बस स्थानकाच्या प्रशस्त जागेवर राज्यस्तरीय भव्य नृत्य स्पर्धा आयोजित केली होती,जेणेकरून प्रत्येक नृत्य कला असणाऱ्या कलाकाराला त्यांच्या कलेसाठी चालना मिळेल आणि त्याच्या मुक्त केलेला एक संधी मिळून आत्मविश्वास वाढून पुढील वाटचालीस नवी उर्जा मिळेल अशी स्वरगंधा ग्रुपची प्रामाणिक संकल्पना आहे...
त्यासाठी त्यांनी राज्यातील प्रत्येक कलाकाराला संधी मिळावी म्हणून ग्रुप डान्स व सोलो डान्स साठी तब्बल 35 हजारापर्यंत बक्षीसे ठेवली होती...
या कार्यक्रमात अनेक नृत्य कलाकारांनी उपस्थिती दाखवली...केळवणे गावात गेल्या १५ वर्षांत प्रथमच असा भव्यदिव्य आणि मोठ्या स्वरूपात राज्यस्तरीय कार्यक्रम सुव्यवस्थित पार पडला त्याचे सारे श्रेय स्वरगंध ग्रुपला आणि केळवणे ग्रामस्थांना जाते...
त्यात म्हणजे .केळवणे गावातील रहिवासी भारत मातेचे सुपुत्र मा. श्री. आदेश धर्माजी घरत आणि मा. श्री . सत्यवान पुंडलिक पाटील या दोन्ही सैनिकांचा विशेष सन्मान मोठ्या प्रमाणत करण्यात आला...
या स्पर्धेत ग्रुप डान्स विजेता रौर डान्स अकॅडमी नवी मुंबई
ग्रुप डान्स द्वितीय क्रमांक जय हनुमान कलामंच (करंजा) उरण
ग्रुप डान्स तृतीय क्रमांकाचा मानकरी स्टेप आर्ट उरण
सोलो डान्स प्रथम विजेता मुग्धा उभारे
द्वितीय क्रमांकाचे मानकरी निलेश म्हात्रे, काव्या जठार
तृतीय क्रमांकाचा मानकरी आर्या नारंगिकर
सर्व विजेत्या स्पर्धकांना बक्षीस आणि स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र दिले तर..प्रत्येक सहभागी स्पर्धकास प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले...
हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी संपूर्ण स्वरर्गंध टीम यांनी विशेष आणि अथक मेहनत घेतली तर dj sam यांनी विशेष महत्त्वाचे सहकार्य केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय श्री जयदास ठाकूर वेश्र्वी यांनी केले..
कार्यक्रम संपन्न होण्यासाठी परिक्षक ज्ञानेश्र्वर सर, पवन सर , सर्व पक्षीय नेते ,पदाधिकारी ग्रामपंचायत सर्व ग्रामस्थ व तरुणवर्गाने महत्त्वाचे सहकार्य करून योगदान दिले...
