महाराष्ट्र वेदभुमी

हौशी बैलगाडी शर्यत धानकान्हे आयोजित शर्यतीत संतोष गायकर,विवेक पाटील यांच्या गाड्या प्रथम

कोलाड (श्याम लोखंडे) 

हौशी बैल गाडी शर्यत धानकान्हे रोहा यांच्या वतीने भव्य जिल्हा स्तरीय धानकान्हे माती बंदर येथे रविवारी १४0 जानेवारी रोजी रायगड जिल्हा स्तरीय बैलगाडी ( छकडा ) जंगी शर्यतींचे आयोजन केले होते. या स्पर्ध्येत रोहा तालुक्यातील उडदवने येथील गाडी मालक संतोष गायकर यांची व विवेक पाटील वडवली माणगाव यांच्या बैलगाडी अंतिम फेरीत प्रथम आल्या तर सेमी फायन मध्ये वासुदेव घोगले माणगाव यांची बैल गाडी प्रथम आली असून स्पर्धेत विजयी होणाऱ्या गाडी मालकाला प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिक देऊन त्यांचा हौशी बैल गाडी शर्यत , गावदेवी क्रिडा मंडळ व ग्रामस्थ धानकान्हे यांच्या वतीने प्रमूख मान्यवर महेन्द्र शेठ पोटफोडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आले...

रायगड जिल्हा स्तरीय रोहा तालुक्यात मौजे गावदेवी धानकान्हे माती बंदरावर रंगलेल्या बैल गाड्यांच्या शर्यतीचा धुरळा पुन्हा हौशी रसिक प्रेक्षकांना पहावयास मिळाला तर उत्स्फुर्तपणे प्रतिसाद लाभलेल्या रोहा तालुक्यातील हौशी बैल गाडी शर्यत धानकान्हे येथील स्पर्धेत जवळपास शंभरहून अधिक बैल गाड्या सहभागी झाल्या होत्या गावदेवी क्रिडा मंडळ ग्रामस्थ धानकान्हे,ग्राम पंचायत देवकान्हे उप सरपंच सूरज कचरे हौशी बैलगाडी मालक यांच्या संयुक्त विद्यमनाने या जंगी बैलगाडी शर्यती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. तर सदरच्या आयोजित केलेल्या या बैलगाडी शर्यतीला फायनल गटातून प्रथम संतोष गायकर उडदवणे रोहा आणि विवेक पाटील माणगाव यांच्या बैल गाड्यांनी सरसी मारली तर द्वितीय त्रिषा खडतर आणि संतोष खडतर माणगाव , तृतीय वासुदेव घोगल,राज गोवर्धने, आणि कमलाकर नीलकर तर सेमिफायनल मध्ये प्रथम वासुदेव घोगले, द्वितीय दिनेश रटाटे, तृतीय सागर मांटे ,यांच्या बैलगाडीने ही शर्यत जिंकली आहे...

गावदेवी धानकान्हे माती बंदरावर रंगलेल्या बैल गाड्यांचा थरार पाहण्यासाठी हजोरोंच्या संख्येने हौशी रसिक यांनी एकच गर्दी केली होती.तर स्पर्ध्येत सहभागी झालेल्या शंभरहून अधिक बैल गाड्यांच्या माध्यमातुन एकुण अकारा गटातून सोडण्यात आलेल्या बैलगाडी शर्यत मध्ये कॉटर फायनल मध्ये संदेश भोईर प्रथम, नथूराम पवार द्वितीय, विहान दिघे तृतीय,तर गट क्रमांक एक मधून गौरव पाबरेकर प्रथम , साहिल साबळे द्वितीय,अजय जाधव तृतीय,गट क्रमांक दोन मधून आरोही गायकवाड प्रथम, प्रयाग बामुगडे द्वितीय , यशवंत थिटे तृतीय,गट क्रमांक तीन मधून साहिल टेंबे प्रथम , जयेश साळसकर द्वितीय, महेश मगर तृतीय,यांच्या बैलगाड्यानी शर्यत जिंकली त्याच बरोबर अतिशय रंगदार आणि मजेदार शर्यतीचा आनंद रसिक प्रेक्षकांना मिळाला तो म्हणजे गट क्रमांक चार ते आठ यामध्ये गट क्रमांक चार मध्ये तेजेश पाटिल, जागृती भोईर, मॅगी ग्रुप, पाच मधून नामदेव देवकर, विश्वास जाधव, सहादेव खेरटकर, सहा मधुन अजित वरणकर, साहिल कडव,राकेश चव्हाण,सात मधून सार्थक घाडगे, अक्षय जाधव, अण्वी खेरटकर, आठ मधून संदेश भोईर,नथूराम पवार,आणि वीहान दिघे, यांच्या बैल गाडी जोडीने रंगत दाखवत बाजी मारली....

तसेच या शर्यतीत बैल गाड्यांचे एकूण आठ गट अधिक कॉटर फायनल आणि दोन फायनल चे गट असे एकुण अकरा गट तयार करण्यात आले होते तर शर्यतीत सर्वांच्या नजरा लागलेल्या अंतिम फेरीत भुर्रर्र गाडीचा धुरळा उडवत व रंगतदार थरार संतोष गायकर उडदवने रोहा आणि विवेक पाटील वडवली माणगाव यांनी फायनलची शर्यत जिंकली, तर त्रिशा खडतर, संतोष खडतर व्दितीय ,आणि वासुदेव घोगले,राज गोव्हर्धने,आणि कमलाकर निलकर यांच्या बैलगाडी जोडीने अंतिम फेरीतील तिसरा  क्रमांक पार करत हे विजेतेपद पटकावले...

हौशी बैल गाडी शर्यत गावदेवी क्रिडा मंडळ व ग्रामस्थ धानकान्हे उप सरपंच सूरज कचरे यांनी आयोजित केलेल्या माती बंदरावर येथील हौशी ग्रामस्थ व बैलगाडी हौशी नागरिकांनी या स्पर्धांचे आयोजन केले होते याला हौशी रसिकप्रेशकांनी भरभरून प्रतिसाद देत याचा आनंद लुटला तर उस्पुर्त प्रतिसाद लाभलेल्या या शर्यतींचा शुभारंभ व बक्षिस वितरण युवकांचे प्रेरणास्थान तथा गोवे ग्राम पंचायतीचे सरपंच व नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब चे अध्यक्ष महेंद्रशेठ पोटफोडे, देवकान्हे ग्राम पंचायतीचे उपसरपंच सूरज कचरे, सदस्य दयाराम भोईर, धोंडू कचरे,शंकर भाऊ धनावडे,डॉ श्याम भाऊ लोखंडे, ज्येष्ठ नागरिक रामचंद्र मरवडे, तळवली तर्फे अष्टमी चे सरपंच रविंद्र मरवडे,उप सरपंच संदीप महाडिक, पोलिस पाटील पांडुरंग कचरे,दयाराम भोईर, मराठी उद्योजक नारायण कान्हेकर,घनश्याम कराले,पांडुरंग गोसावी,संतोष भोईर,गणेश पवार,सुनिल थिटे,नंदकुमार मरवडे,सुनिल महाडिक,एकनाथ मरवडे,सुरेश महाडिक,नितीन कचरे,निळू देवकर, अनिल जाधव, विश्वास राऊत, अशोक देवकर, नरेश कचरे,आदी हौशी बैल गाडी स्पर्धक ग्रामस्थ तसेच हौशी रसिक प्रेक्षक बहुसंख्येने उपस्थीत होते...

तर गावदेवी धानकान्हे माती बंदरावर रंगतदार बैल गाड्या शर्यतींचा थरारचे उत्तम समालोचन नंदकुमार मरवडे आणि सुनिल थिटे यांनी केले तसेच उपस्थीत मान्यवरांचे स्वागत आयोजक उपसरपंच सूरज कचरे यांनी केले तसेच या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी हौशी बैल गाडी शर्यत गावदेवी क्रिडा व ग्रामस्थ धानकान्हे यांनी अथक परिश्रम घेतले...

Post a Comment

Previous Post Next Post