महाराष्ट्र वेदभुमी

लायन्स क्लब पनवेलतर्फे लायन्स इंटरनॅशनल संस्थेचे संस्थापक मेल्विन जोन्स यांच्या जन्मदिन

 

विशेष प्रतिनिधी - पनवेल

लायन्स क्लब पनवेलतर्फे लायन्स इंटरनॅशनल संस्थेचे संस्थापक मेल्विन जोन्स यांच्या जन्मदिनानिमित्त शनिवार दिनांक १३ जानेवारी रोजी रायगड जिल्हा परिषद प्रा.शाळा मेमरी कातकरवाडी तालुका खालापूर जिल्हा रायगड येथील विद्यार्थ्यांसोबत केक कापून त्यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला.. तसेच बारा ते पाच या वेळेत विनामूल्य नेत्रचिकित्सक आणि मोतीबिंदूची तपासणी झाली...तसेच अन्नदान छत्र व शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना ड्रेस वाटप व वस्तूंचे वाटप हा उपक्रम झाला... त्यामध्ये वाढीतील एकूण ४२ नेत्र तपासण्या करण्यात आल्या तसेच १४ चष्मे वाटप करण्यात येतील त्यामध्ये एकूण बारा मोतीबिंदूंचे रुग्ण आढळले त्यांची लायन्स क्लब पनवेलतर्फे अत्याधुनिक पद्धतीने मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे आयोजित आहे.. 

लायन्स क्लब तर्फे टेंबरी कातकरवाडी प्राथमिक शाळेच्या एकूण १०५ विद्यार्थी व विद्यार्थिनींना व अंगणवाडीच्या ४५ अशा एकूण १५० मुलांना आणि मुलींना गणवेश व बिस्किट वाटप करण्यात आले.. हे सर्व साहित्य लायन्स ज्योती पुतळा आणि लायन्स श्याम भुतडा यांच्यामार्फत देण्यात आले... तसेच शोभा जिल्हा यांनी बसण्यासाठी सतरंजी दिली...पनवेल लायन्स क्लबच्या सदस्यांनी स्वतः शाळेतल्या विद्यार्थ्यांना तसेच टेंबरी कातकरवाडी मधील लोकांना अशा एकूण ५५० लोकांना खिचडी देण्यात आली...व टेंबरी कातकरवाडीमध्ये लोकांशी संवाद साधला लायन्स रमाकांत म्हात्रे यांच्या हस्ते मेल्वीन जोन्स यांच्या जन्मदिनानिमित्त केक कापण्यात आला.. त्याचप्रमाणे त्यांनी विविध उपक्रम राबविण्यासाठी त्यांचे सहकार्य राहील असे त्यांनी सांगितले या उपक्रमासाठी लायन्स लुईस कॉल्यासो ऑप्टिमिस्टिक तर्फे नेत्रचिकिस्ता करण्यात आली जी वयस्कर रुग्ण येऊ शकत नव्हते त्यांच्या कातकरवाडीतील घरी जाऊन नेत्र तपासणी करून त्यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांना खिचडीचे वाटप केले... जे मोतीबिंदूचे रुग्ण आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांची शस्त्रक्रिया करण्यात येईल... असे अध्यक्ष एस जी चव्हाण व सेक्रेटरी अशोक गिल्डा यांनी रुग्णांना सांगितले आहे.. तसेच मुख्याध्यापक मा. सतीश सोनवणे व अंगणवाडी शिक्षिका श्यामला मोरे मॅडमनी काही शाळेसाठी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या गरजू वस्तू मिळविण्यासाठी विनंती केली... त्याबद्दल अध्यक्ष लायन्स एस जी चव्हाण यांनी त्या वस्तू मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील असेही सांगितले या उपक्रमासाठी टेंबरी गावाचे ग्रामपंचायत सरपंच माननीय श्री रमेश गायकवाड व इतर ग्रामपंचायत सदस्य व एस एच केळकर कंपनीचे सहाय्यक एच आर मॅनेजर माननीय श्री संजय ठाकूर व यशस्वीचे चीप फायनान्स ऑफिसर माननीय श्री देविदास माळी यांनी हजर राहून कार्यक्रमास शोभा आणली...या उपक्रमासाठी लायन्स क्लबतर्फे डिस्ट्रिक्टचे संगीता म्हात्रे,ला.गणेश देशमाने, ला. संजय गोडसे लायन्स प्रमोद गजहंस लायन्स मोतीलाल जैन ला. नंदकुमार धोत्रे लायन्स कोलासो लायन्स शाम भुतडा व इतर व्यक्ती उपस्थित होते... यांनी खिचडी वाटण्याचा आनंद घेतला.. या उपक्रमासाठी लायन्स सुयोग पेंडसे आणि लायन सुरभी पेंडसे यांनी सद्गुरु कॅट्ररस मार्फत ५५० लोकांसाठी स्वादिष्ट व रुचकर खिचडी बनवून मोलाचे सहकार्य केले हा उपक्रम घडविण्यासाठी यशस्वीचे माननीय श्री बाळकृष्ण म्हात्रे व राज शिंदे व अक्षय जाधव यांचे सहकार्य लाभले शाळेचे मुख्याध्यापक सोनवणे सर पडवळ सर व अंगणवाडीच्या शिक्षिका शामल मोरे यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले या उपक्रमासाठी जवळजवळ ७५ हजाराच्या वर खर्च आला असून त्यासाठी पनवेलच्या दानशूर व्यक्ती त्याचप्रमाणे पनवेलच्या व्यापारी बंधूंनी वेगवेगळ्या किराणाचे सामान देऊन मोलाचे सहकार्य केले...त्यासाठी पनवेल क्लबने त्यांचे आभार व्यक्त केले.. लायन्स क्लबचे अध्यक्ष एस जी चव्हाण आणि सेक्रेटरी अशोक गिर्डा व इतर लायन्स क्लबचे सीनियर सभासदांनी सांगितले की अशा प्रकारच्या गरजू व्यक्तींसाठी अनेक उपक्रम राबवत आहोत आणि राबवले जातील..

Post a Comment

Previous Post Next Post