शहानवाज मुकादम/रोहा
रोहा: तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सारसोली आणी रोहा मेडिकल फाउंडेशन यांच्या तर्फे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन...ग्रुप ग्रामपंचायत सारसोली हद्दीतील मौजे सुडकोली पो.चणेरा येथे दि:१६/ जाने /२०२४, रोजी सकाळी १० ते दुपारी ०१.०० वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे...
या शिबीरामध्ये १) मधुमेह तपासणी, २) रक्त तपासणी, ३) ई. सी.जी. तपासणी करण्यात येणार आहे...
सदरच्या आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ रोहा तालुक्यातील गोरगरिब जनतेने घेण्यात यावा आशी विनंती रोहा मेडिकल फाउंडेशन व ग्रामपंचायत सारसोली यांच्याकडून करण्यात आली आहे....
