महाराष्ट्र वेदभुमी

घाडी बंधू पुरस्कृत मुनवली चषक २०२४ क्रिकेट चषकाचा मानकरी बापदेव संघ मांडवखार

 


अब्दुल सोगावकर :अलिबाग

सोगांव दि.२८मार्च, अलिबाग तालुक्यातील मुनवली येथील घाडी बंधु पुरस्कृत मुनवली चषक २०२४ च्या मूनवली येथे क्रिकेटच्या भव्य स्पर्धांचे आयोजन दि.२७ व २८ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. या स्पर्धांचे उद्घाटन रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष सुनिल थळे व रायगड जिल्हा काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांच्याहस्ते व ग्रामपंचायत सदस्या सानिका घाडी, ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश वडे, माजी उपसरपंच समद कुर, बहिरोळे पोलीस पाटील प्रफुल्ल थळे, विवेक जोशी, सामाजिक कार्यकर्ते सतिश घाडी, सचिन घाडी, विजय घरत, राजेंद्र घरत, सुधाकर ठकरूळ, मधुकर सूद, दिलीप मोंढे, संतोष बांद्रे, मनिष खाडे, रुपेश अनमाने, माजी ग्रामपंचायत सदस्य लाईक कप्तान, मुनावर कुर, सूचित थळे, अक्षय जाधव, मूनवली महिला मंडळाच्या महिला अध्यक्षा संगीता मल्हार, अहिल्याबाई होळकर पुरस्कार विजेती सुप्रिया ठकरूळ व इतर महिला वर्ग मूनवली, सोगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आले.

              यास्पर्धेत एकूण १६ नामवंत संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत अंतिम सामना बापदेव मांडवखार व  जय हनुमान संघ मूनवली या संघामध्ये होऊन अटीतटीच्या लढतीत बापदेव मांडवखार संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक ३०, ००० व चषक पटकावला तर द्वितीय क्रमांक १५,००० व चषक जय हनुमान मूनवली संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.

         स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज म्हणून कल्पेश पाटील बापदेव मांडवखार संघ याने पटकावले तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गांधार पाटील बापदेव मांडवखार संघ याने पटकावले, तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून समीर ठकरूळ जय हनुमान मूनवली संघ याला गौरविण्यात आले. सामनावीर म्हणून जय हनुमान संघाचा प्रतीक अनमाने याला मान देण्यात आला, यावेळी सर्व खेळाडूंना व संघांना कै. धर्मा अनमाने व कै. सुनीता अनमाने यांच्या स्मरणार्थ प्रतीक प्रमोद अनमाने यांजकडून ट्रॉफी देण्यात आली. तसेच सामन्यादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रत्येक खेळाडूंना अल्पेश मल्हार आणी अतिष मल्हार यांजकडून टी शर्ट चे वाटप करण्यात आले. या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

         बक्षीस समारंभ रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष सुनिल थळे यांच्या हस्ते व उमेश ठाकूर, ग्रामपंचायत सदस्या सानिका घाडी, मापगांव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच समद कुर, संजय शिंदे, तंटामुक्ती उपाध्यक्ष विवेक जोशी, रायगड जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक उपाध्यक्ष लाईक कप्तान, अनिल जाधव, चंद्रकांत खोत, संजय शिंदे, विवेक जोशी, अभिजित राणे व राजन नार्वेकर यांचे प्रतिनिधी, संजय अनमाने, मधुकर सूद, सूचित थळे, सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी, तसलीम कप्तान, तौसिफ कप्तान, साहिल कुर, अरविंद मसुरकर, संतोष सकरे, मुनवली महिला मंडळ तसेच मुनवली ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिक व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धांसाठी मंडप व्यवस्था, संजय अनमाने, डिजेची व्यवस्था शैलेश तिर्लोटकर यांनी केले, तसेच स्पर्धेत सुहास फाटक, इमरान बुखारी, नदीम वाकनिस, विवेक जोशी, यांनी उत्तमरीत्या करत उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

       यावेळी सर्व मूनवली ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी व घाडी बंधू यांच्या पुढाकाराने मूनवली क्रीडांगण समपातळीकरण करून घेतल्या बद्दल ग्रामस्थांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. याचवेळी उपस्थित मान्यवरांनी व क्रिकेटप्रेमीं नागरिकांनी विजयी बापदेव मांडवखार संघावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे...

फोटो लाईन : घाडी बंधु पुरस्कृत मुनवली क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेता बापदेव मांडवखार संघाला पारितोषिक देतांना मान्यवर व उपस्थित ग्रामस्थ,

Post a Comment

Previous Post Next Post