कोलाड (श्याम लोखंडे)
रोहा तालुक्यातील तसेच खांब विभागातील शिवकालीन सुरगडावर फडकला तिरंगा आणि भगवा ध्वज अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघ यांच्या वतीने ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष निमित्त प्रजासत्ताक दिनी ३५० किल्यांवर पूजन व ध्वजारोहण संकल्प करण्यात आला होता... या संकल्पपूर्तीसाठी तालुक्यातील किल्ले सुरगडावर स्थानिक सुरगड संवर्धन संस्था आणि श्री शिवसंस्कार प्रतिष्ठान वेलशेत या दोन संस्थांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला...
शुक्रवारी २६ जानेवारी रोजी देशाच्या प्रजाकसत्ताक दिनानिमित्त तसेच या संकल्पपूर्तीसाठी दोन्ही संस्थेच्या ३९ सभासदांनी सहभाग नोंदवला... किल्ले सुरगडाच्या गडदेवतांचं प्रथम पुजन करून दक्षिण बूरूजावर आपल्या देशाची आन बान शान असलेला तिरंगा आणि परम पवित्र भगवा ध्वज उभारून स्थानिक सुरगड संवर्धन संस्था आणि शिवसंस्कार प्रतिष्ठान वेलशेत चे संस्थापक अध्यक्ष यांच्या हस्ते या प्रसंगी ध्वजारोहन करण्यात आले... त्यानंतर शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रगीत, ध्येयमंत्र, प्रेरणा मंत्र आणि शिव प्रतिज्ञा घेण्यात आली...
सोहळ्याच्या सरतेशेवटी सर्व सभासदांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं दर्शन घेत प्रसादी घेऊन सोहळ्याची सांगता केली अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघ यांच्या या संकल्पपूर्तीच्या मार्गदर्शक नियमांच पालन करून स्थानिक सुरगड संवर्धन संस्था आणि श्री शिवसंस्कार प्रतिष्ठान वेलशेत या दोन्ही संस्थानी हा संकल्पपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात व आनंदात पार पाडला...
