रोहा - प्रतिनिधी ;-
रोहा शहरातील रायकर पार्कमधील पारिजात संकुल तसेच परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे रोहा पोलीस निरीक्षकांनी अनावरण केले आहे... या परिसर आता चोवीस तास तिसऱ्या डोळ्यांच्या नजरेखाली राहणार...
या संकुल परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात यावेत अशी नागरिकांची मागणी होती, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन संकुलाच्या पदाधिकाऱ्यांनी रोहा पोलिस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक संदीप ऐदाले यांचे हस्ते संकुलासह आजूबाजूच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे अनावरण केले... यावेळी माजी उपनगराध्यक्षा प्राजक्ता चव्हाण, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष सुरेंद्र निंबाळकर, संकुलाचे अध्यक्ष परशुराम चव्हाण, जयवंत गुरव, संदीप गुरव, सुनील कासार आदी पदाधिकऱ्यांसह मोठ्या संख्येने रहिवासी उपस्थित होते... सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संकुल परिसरात चोवीस तास जगता पहारा राहणार असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे...
या प्रसंगी सहा. पो. नि. संदीप ऐदाले यांनी मार्गदर्शन करतांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे स्पष्ट करतानाच काही मार्गदर्शक सूचना करून या उपक्रमासाठी पदाधिकारी व सर्व रहिवाश्यांना धन्यवाद दिले आहेत...
