महाराष्ट्र वेदभुमी

खांब विभागीय मानाच्या मैत्री चषकाचा मानकरी ठरला धाक्सूद क्रिडा मंडळ चिल्हे संघ .

 

कोलाड (श्याम लोखंडे) : 

रोहा तालुक्यातील खांब विभागातील खांब विभागीय असो.आयोजित मैत्री चषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात अखेर अतितटीच्या लढतीत धाक्सुद क्रिडा मंडळ चिल्हे हा संघ ठरला स्पर्धेत अंतिम विजेता स्पर्धेतील अंतिम सामना हा धाक्सूद चिल्हे विरुद्ध धाक्सुद क्रिडा मंडळ चिल्हे यांच्यात झालेल्या अखेरच्या अंतिम अटीतटीच्या सामन्यात अखेर धाक्सुद क्रिडा मंडळ संघाने धडाकेबाज खेळी करत अंतिम बाजी मारत प्रथम क्रमांक पटकवला तर धाक्सुद चिल्हे संघाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तसेच स्पर्धेतील तृतीय क्रमांक गावदेवी नडवली हा संघ मानकरी ठरला.तर चषकतील मालिकावीर नडवली संघाचा नितीन भोसले, उकृष्ट फलंदाज खांब संघाचा नाना खामकर,तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मुठवली  संघाचा स्वप्निल कापसे,तसेच अखेरचा अंतिम फेरीतील सामन्याचा उत्कृष्ट फलंदाज आविष्कार खांडेकर,तर गोलंदाज रोशन कोंडे हे ठरले तर दोन दिवसातील खेळाच्या सामन्यात उत्कृष्ठ खेळाडू म्हणुन राहूल पोटफोडे आणि नितीन भोसले हे ठरले यांना प्रमुख पाहुण्याच्या शुभहस्ते गौरविण्यात आले...

खांब विभागीय क्रिकेट असोसिएशन च्या मान्यतेने तसेच सालाहाबाद प्रमाणे यंदा ही या विभागीय असो च्या वतीने १३ व १४ जानेवारी रोजी श्री गावदेवी  नडवलीच्या भव्य प्रांगणात या खेळाचे दोन दिवस आयोजन करण्यात आले होते...तर दोन दिवसीय आयोजित या मर्यादित चषकाच्या सोर्ध्येला येथील खेळाडूंनी भरभरुन प्रतिसाद दिला. आयोजित केलेल्या स्पर्धा नडवलीच्या प्रांगणात भव्य दिव्य असे क्रिकेट सामन्याचे उद्घाटन खांब धामणसई विभागीय ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार डॉ श्यामभाऊ लोखंडे,खांब ग्राम पंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ कांचनताई मोहिते, विभागीय क्रिकेट असो.अध्यक्ष अजय भोसले,उपाध्यक्ष नितेश कोंडे, मनोज थिटे,संदेश मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते करण्यात आले आदी सर्व खेळाडू तसेच क्रिडा रसिक बहुसंख्येने उपस्थित होते...

खांब क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने तसेच असो. चा समजला जाणारा मानाचा चषकाच्या स्पर्धा भव्यदिव्य आयोजित केलेल्या सदरच्या मर्यादित शतकाच्या क्रिकेट स्पर्धेला रसिकप्रेशकांचा भरभरून प्रतिसाद लाभला होता.तर खेळातील रंगतदार सामन्यातील गावदेवी नडवली विरुद्ध धाक्सुद क्रिडा मंडळ चिल्हे यांच्यात उपांत्य फेरीतील सामन्याचा रंगतदार थरार रसिकप्रेशकाना आनंद देऊन गेला मात्र शेवट अखेर एका धावने विजय संपादित करत नडवली संघाला पराजीत करत चिल्हे संघानी बाजी मारत अंतिम फेरीत प्रवेश केला तर अंतिम फेरीचा सामना हा धाक्सुद क्रिडा मंडळ चिल्हे विरुद्ध धाक्सूद चिल्हे यांच्यात रंगतदार झाला तर प्रथम नाणेफेक जिंकून धाक्सूद चिल्हे यांच्यात अटीतटीची लढत संघाची तसेच फलंदाजांची चौकार षटकारांची आतषबाजी धुव्वांधार खेळी त्यातच गोलंदाजाची खरी कसरत अखेरच्या क्षणी कामी आल्याचे दिसून आले या अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामाना हा अखेर बरोबरीत सुटला मात्र अखेर पंचांच्या नियमानुसार सदरच्या सामन्यातील बरोबरी काढत हा सामना गोलंदाज यांच्या विकेट नुसार विजयाची घोषणा ही धाक्सुद क्रिडा मंडळ चिल्हे या संघाची करण्यात आली आणि मानाच्या विभागीय चषकावर त्यांचे नाव कोरले तर धाक्सुद चिल्हे संघाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागेले...


अभुतपुर्व प्रतिसाद लाभलेल्या सदरची स्पर्धा यशस्वी पार पडण्यासाठी खांब विभागीय क्रिकेट असोिएशनच्या  सर्व पदाधिकारी वर्गाने व खांब क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष अजय भोसले सह सर्व खेळाडूंनी अथक परिश्रम घेतले...

Post a Comment

Previous Post Next Post