रोहा प्रतिनिधी भाग्येश घोसाळकर
श्री विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रोहा, रायगड संस्थेमार्फत रोहा तालुक्यामध्ये विविध कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जातात. महिलांनी आर्थिक सक्षम व्हावे व स्वतःची एक नवीन ओळख घडवावी यासाठी संस्था महिलांच्या पाठी नेहमीच उभी आहे. शिवणकला प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांनी आज दिनांक १६/०१/२०२४ रोजी मोठ्या उत्साहात अडीच महीने प्रशिक्षण घेऊन निरोप समारंभ साजरा केला...
प्रशिक्षणामध्ये येण्यापूर्वी आमची ओळख आणि आताची निर्माण झालेली ओळख व आत्मविश्वास यामध्ये खूप फरक पडला आहे...आणि त्यामुळे महिलांनी आवर्जून संस्था प्रमुख श्री रुळेकर साहेब आणि प्रशिक्षक मॅडम सीमा गुदले यांचे आभार व्यक्त केले... संस्थेने जे महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण घेण्याचे काम सुरू केले आहे त्यामुळे अनेक महिलांना रोजगार उपलब्ध होत आहे... व महिला आर्थिक सक्षम होत आहेत महिलांनी अत्यंत भावूक होऊन त्यांचे मनोगत व्यक्त केले...महिलांनी स्वतः हस्तकलेने तयार केलेली एक सुरेख अशी भेट वस्तू संस्थेला भेट स्वरूपात देऊन संस्थेचे आभार मानले...
