अब्दुल सोगावकर अलिबाग
सक्षम एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित
सोगाव : गेली ५ वर्षे रायगड जिल्ह्यामध्ये विविध शैक्षणिक कार्यक्रम राबवणाऱ्या सक्षम एज्युकेशन सोसायटी तर्फे अलिबाग तालुक्यातील कामार्ले येथे रविवार दि.१४ जानेवारी रोजी इयत्ता ७ वी व पुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कामार्ले येथील गणेश मंदिरात श्रीफळ वाढवून सदर कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. या कार्यक्रमात सूचिता साळवी - स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा तथा स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका, शार्दूल काठे - डेप्युटी चीफ मॅनेजर - टाइम्स ऑफ इंडिया, परेश सुर्वे - एक्सिक्युटीव्ह शेफ - एलीओर इंडिया, तसेच योगेश पवार - कलाकार व रायगड भूषण पुरस्कारार्थी यांनी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थेचे सदस्या शुभांगी कुलकर्णी, सदस्य अक्षय म्हात्रे, प्रसन्न ठाकूर व सागर तरंगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदर कार्यक्रम संपन्न झाला. याकार्यक्रमाच्या केंद्रस्थानी विलास पाटील सर हे होते...
कामार्ले गावातील समाजसेवेची अतिशय आवड असलेले ग्रामस्थ गणेश पाटील व योगिता गणेश पाटील यांच्या पुढाकारातून ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या करिअर मार्गदर्शन शिबिरात कामार्ले पंचक्रोशीतील विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते...
फोटो लाईन : कामार्ले येथे करिअर मार्गदर्शन शिबिरात उपस्थित विद्यार्थी व त्यांचे पालक तसेच मार्गदर्शन करणारे मान्यवर व ग्रामस्थ,
