माणगाव प्रतिनिधी सिकंदर आंबोणकर
रायगड जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व दलितमित्र चंद्रकात अधिकारी यांचे ज्येष्ठ सुपुत्र श्री श्रीप्रकाश अधिकारी यांनी तमिळ कादंबरी"कथा मरुभूमीची"चा मराठीत अनुवाद केला असून त्यांना"साहित्य भारती पुरस्कार"प्राप्त झाला आहे़.अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती,कोकण प्रांतांच्या वतीने रविवार, दि.१७ डिसेंबर २०२३ रोजी ठाण्यातील तीन हात नाक्याजवळील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे एक दिवसीय साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते श्रीप्रकाश अधिकारी यांना सन्मानित करण्यात येणार आहे़.
अधिकारी,इंग्रजी,अर्थशास्त्र,मराठी,संस्कृत विषय घेउन एम .ए. झाले.त्यांनी पस्तीस वर्ष शिक्षक म्हणून काम केल्यानंतर तीन वर्ष माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक झाले. १९९८ पासून काही वर्ष रायगड मिलेटरी स्कूलचे प्राचार्य म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.
सरांचे मराठी भाषे प्रमाणे तमिळ भाषेवर प्रभुत्व आहे .त्यांनी चार तामिळ भाषेतील कादंबऱ्याचे मराठी भाषेत अनुवाद करून श्रध्दागौरी, कावेरी, मुके डोळे आणी स्नेहदी हया कादंबऱ्यांची निर्मिती केली.त्यांनी विविध दिवाळी अंकात, साप्ताहिकात,दैनिकांत, अनुवादित कथा, लेख प्रसिध्द झाले आहेत.ते नेहमी सांगतात *मराठी भाषा ही आपली माता आहे तिचा आपल्याला नक्कीच अभिमान वाटला पाहिजे तिच्यावर प्रेम जरूर करा परंतु इतर सर्व भाषा हया आपल्या मावशी आहेत* . आपण आई प्रमाणे मावशीवर सुध्दा जसे प्रेम करतो तसेच इतर भाषांवर सुध्दा प्रेम करा त्या आत्मसात करा . त्यांनी बालचित्रवाणी कार्यक्रमासाठी लिखाण करून कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. रत्नागिरी आकाशवाणी वरून त्यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत.
अधिकारी सरांना शैक्षणिक क्षेत्राप्रमाणे सामाजिक क्षेत्रांत काम करण्याची आवड आहे .त्यांना अनेक संस्थांच्या वतीने विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे . सरांना प्रफुल्लचंद्र,उदय हे दोन बंधु आणी अनुपमा कुळकर्णी तसेच संध्या शहापुरे हया भगिनी आहेत. सर्व भावंडांनी आपापल्या कार्य क्षेत्रांत उच्च स्थान प्राप्त केले आहे .
