महाराष्ट्र वेदभुमी

विर ते पनवेल लोकल ट्रेन सुरु करण्याची जनतेची मागणी

 


 पुगांव रोहा (नंदकुमार कळमकर )

कोकण रेल्वे खऱ्या अर्थाने कोलाड पासून सुरु झाली परंतु याच कोलाड रेल्वे स्टेशनला रत्नागिरी पॅसेंजर  शिवाय कोणतेही ट्रेन थांबत नसल्याने विर ते पनवेल लोकल ट्रेन सुरु करण्याची मागणी जनतेकडून केली जात आहे...

दिवसेंदिवस कोकणचा विकास होत असुन हा कोकण रेल्वेचा रोहा ते दिवा मार्ग फक्त ६६ किलोमीटर आहे येथे पोहचण्यासाठी ५३ मिनिटे लागतात विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यातील रोहा, तळा, माणगाव, महाड,म्हसळा,श्रीवर्धन या सहा तालुक्यातील मुंबई-ठाण्याकडे नोकरीनिमित्त जाणारी लोकांची संख्या ही जास्त आहे...यामुळे वीर ते पनवेल लोकल ट्रेन सुरु करणे अधिक फायद्याचे होईल...

या मार्गावर अनेक औद्योगीकरण, पर्यटन स्थळे आहेत.. परंतु रोहा ते वीर मार्गांवरील रत्नागिरी पॅसेंजर रेल्वेशिवाय इतर रेल्वे गाड्या थांबत नाही फक्त माणगाव येथे लांब पल्याच्या गाड्या थांबतात परंतु या रेल्वे गाडी येथील लोकांसाठी अपुरी पडत आहे...रोहा रेल्वे स्थानकातून जादा लोकल ट्रेन सुरु केली आहे परंतु त्यांचा फायदा रोहा पासुन पनवेलकडे जाणाऱ्या चाकरमान्यासाठी होत आहे...

कोलाड येथे रोरो सेवा सुरु आहे परंतु कोलाड, इंदापूर, माणगाव, वीर या स्थानकात लोकल रेल्वे गाडी सुरु केली तर याचा फायदा रोहा, तळा, माणगाव, महाड, श्रीवर्धन, म्हसळा या तालुक्यातील असंख्य जनतेला होईल कारण आधुनिक काळात शिक्षणाची प्रगती झपाट्याने होत आहे... त्यामुळे वीर ते पनवेल लोकल रेल्वे गाडी सुरु केल्याने मुंबई-ठाणे येथे जाऊन येथील विद्यार्थ्यांना पार्टटाइम नोकरी करता येईल यामुळे आर्थिक फायदा होईल..शिवाय महिला ही आपले कुटुंब सांभाळून पार्ट टाइम नोकरी करू शकतील...तसेच या परिसरातील व्यवसाय वाढेल याशिवाय मुंबई-ठाण्याकडे जाणाऱ्या जनतेची गैरसोय ही दुर होईल...यासाठी पनवेल ते वीर लोकल रेल्वे गाडी सुरु करावी अशी मागणी या परिसरातील नागरिक करीत आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post