महाराष्ट्र वेदभुमी

शेतकऱ्यांनी मुंबई गोवा महामार्गासाठी पुकारण्यात आलेला बेमुदत साखळी उपोषण चार दिवसानंतर मागे.


पुगाव - रोहा (नंदकुमार कळमकर ) 

रायगड जिल्ह्यातील कासु-पांडापूर येथे स्थानिक शेतकऱ्यांनी दिनांक-१२ डिसेंबर २०२३ पासून मुंबई गोवा महामार्गाच्या गलथान कारभारामुळे तसेच शेतकऱ्यांचे होत असलेल्या पिकांचे नुकसान त्या विरोधात यासाठी मागील ०४ दिवसांपासून बेमुदत साखळी उपोषण येथील सुजाण नागरिक, स्थानिक शेतकरी यांच्या वतीने जनआक्रोश आंदोलन छेडण्यात आले होते परंतू ते चार दिवसानंतर शेतकरी आंदोलकर्त्यांना प्रशासनानची विनंती तूर्तास मागे घेण्यात आले आहे .


मुंबई गोवा महामार्गाचे काम आपण दिलेल्या वेळेत पूर्ण करावे तसेच दि -१२ डिसेंबर २०२३ पासून कासू ते नागोठणे येथील रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरु करण्यात यावे. तसेच तो पूर्णपणे पेव्हर ब्लॉक मुक्त असावा. काम पूर्ण होई पर्यंत धुळीचे कण उडणार नाहीत याची योग्य ती दक्षता घेण्यात यावी.

राष्ट्रिय महामार्ग क्र.६६ पनवेल ते इंदापूरच्या रस्ता रुंदिकरणाच्या कामात पाटणी ते आनंदनगर येथील शेतकऱ्याच्या सुपीक शेती लगत केलेल्याभरावामुळे, शेतीचे पाणी व सांडपाणी जाण्याचा मार्ग बंद झाला असल्याने सुपीक शेतीचे अनेक वर्षापासुन होणारे नुकसान भरपाई मिळणे बाबत व भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी ३१.१२.२०२३ पर्यंत पक्का नाला बांधून मिळावे.



महामार्गावर पूर्णतः धुळीचे साम्राज्य पसरलेले असून प्रवासी व स्थानिकांना आजाराचा सामना करावा लागत आहे, यावर त्वरित उपाययोजना करण्यात यावी. जी घरे धूळ बाधित झालेली आहेत त्यांची चौकशी करून त्यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळच्या अधिनियम अन्वये कारवाई करुन अहवाल मिळावा.

आज पर्यंत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघात होऊन जेवढे निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडलेत त्यांच्या कुटुंबियांना किमान २०- २५ लाख आर्थिक सहाय्य व शासकीय नोकरी देण्यात यावी.

प्रशासनाच्या दुर्लक्षितेमुळे अपघातामध्ये ज्यांनी कायमस्वरूपी अपंगत्व पत्करले आहे त्यांचा हॉस्पिटलचा सर्व खर्च व त्यांच्या पुढील खडतर आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शासनाने विशेष मोहीम राबवित दत्तक घ्यावे आणि 10 लाख पर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात यावे. तसेच त्वरित दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात यावे. महामार्ग होण्यास विलंब का झाला यासाठी चौकशी समिती प्रस्थापित करुन चौकशीचा अहवाल मिळावा.सदर महामार्ग पलस्पे ते झाराप पूर्ण MORTH च्या नियमानुसार जो पर्यन्त पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा टोल आकारु नये.

मुंबई गोवा महामार्गावर होणाऱ्या अपघाताला शासन, प्रशासन, ठेकेदार व अडवणूक करणारे लोकप्रतिनिधी » जबाबदार असून याची सखोल चौकशी करून या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा व कामात दिरंगाई केल्याबाबतचे गुन्हे दाखल करून समस्त कोकणकरांना न्याय द्यावा जेणें करून भविष्यात असे अडथळे निर्माण होणार नाहीत. पळस्पे ते कासु करण्यात आलेले काम नित्कृष्ठ दर्जाचे असून थर्ड पार्टी ऑडिट करण्यात यावे.

दि. १२/१२/२०२३ पर्यंत वरील मागण्यांची संपूर्ण पूर्तता न झाल्यास तसेच कामाला प्रत्यक्षात सुरुवात न झाल्यास नाइलाजास्तव कासू ते वाकण (NH 66) हा मार्ग जीवितास धोकादायक असून मानवी वापरासाठी योग्य नसल्याने शांततापूर्वक बेमुदत उपोषण चालु ठेवण्यात येईल याची नोंद घ्यावी. वरील प्रमुख मागण्या यासाठी सुजाण नागरिक स्थानिक शेतकरी त्रस्त कोकणकर मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समिती यांच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले होते 

येथील स्थानिक शेतकऱ्यांनी केलेल्या उपोषणाच्या पहिल्याच दिवशी प्रशासनाकडून कासु ते पांडापूर येथील ३००-४०० मिटर रस्त्याचे DLC कामाला सुरुवात करण्यात आली व दिवसाला धुळीवर पाणी फवारणी व मारण्याचे काम करण्यात आले.अधिकारी पहिल्याच दिवशी चर्चेला आले परंतु आम्हाला आता तोंडी चर्चा मान्य नसून लेखी स्वरूपात उत्तरे द्यावीत अशी भूमिका उपोषणकर्ते, सुजाण नागरिक व शेतकरी यांच्या वतीने घेण्यात आली.पहिल्याच दिवशी १२ उपोषणकर्ते व २५०-३०० कोकणकर, सुजाण नागरिक, स्थानिक रहिवाशी व शेतकरी यांनी सहभाग नोंदवला. 

दुसऱ्या दिवशी सकाळी ०७:०० वाजल्यापासून पाण्याचे टँकर वाढवून सरकारमुळे धुळीचे माहेर घर झालेल्या कासु ते पांडापूर या टप्यात पाणी ०८ टँकरच्या माध्यमातून पाणी मारण्याचे काम सुरु झाले तर दुसऱ्या बाजूला DLC चे काम चालु होते. उपोषणकर्ते आपल्या उपोषणावर थांब असल्याने सायंकाळी लेखी उत्तरे घेऊन प्रशासन उपोषण स्थळी पोहचले परंतु अर्धवट व थातूर मातुर उत्तरे आम्हाला मान्य नसून उपोषणकर्ते आपल्या मतांवर एकमत राहिले व दुसरा दिवस देखील निकाला अभावी गेला.

तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्यांची संख्या वाढली. उपोषणाची बातमी वाऱ्यासारखी पंचक्रोशीत पसरली.अनेक संघटना,वरिष्ठ सदस्य, स्थानिक रहिवाशी यांनी उपोषणाला पाठिंबा दर्शवीला.प्रशासनाला वेळ देण्यात आला. तर दुसऱ्या बाजूने उपोषणात तिव्रता आणण्याचे काम करण्यात आले. अधिकारी यांच्या सोबत फोनद्वारे संपर्क करून लेखी उत्तर न मिळाल्यास सदर उपोषण ठिकाणाहून उठून तुमच्या कार्यालयात येऊन बसु असे ठणकावून सांगण्यात आले, परंतु आम्हाला वेळ द्यावा म्हणून प्रशासनाकडून विनंती करण्यात आली.

चौथ्या दिवसाच्या बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात झाली. तेथील स्थानिकांनी आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल आवाज उठविण्यासाठी पाठिंबा दर्शवीला शेकडो महिला विविध विभागातून उपोषण स्थळी दाखल झाल्या. उपोषणाला तीव्र स्वरूपाची धार येताना दिसत होती. प्रशासन उपोषण कर्त्यांचा अंत पाहत होते, पण  उपोषणकर्ते शांत बसणारे न्हवते. अखेर स्थानिकांचा पाठबल, आंदोलनाची तिव्रता बघून प्रशासनाला अखेर लेखी स्वरूपात उत्तरे द्यावी लागली व शेतकऱ्यांचा नाला प्रश्न याची रिपोर्ट व पुन्हा प्रत्येक्ष स्थळ पाहणी करत  सर्वांच्या एकमताने ०४ दिवसाने बेमुदत साखळी उपोषण मागे घेण्यात आला.

चौथ्या दिवशी आंदोलनाची गर्दी पाहता या महिला कुठून पैसे देऊन आणलेल्या न्हवत्या किंवा गाड्या पाठवून आणलेल्या न्हवत्या तर स्वखर्चाने आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल उपोषण स्थळी दाखल झाल्या...या सर्व आंदोलनात पेण -कासू विभागातील सुजाण नागरिक चैतन्य उषा लक्ष्मण पाटील,धनाजी शेळके ,रुचिता हिरा खंडू तांडेल ,डॉ.भावनाताई पाटील ,चेतन तांडेल,सिद्धेश जुईकर, अभय पाटील तसेच मागील ०४ दिवसापासून आपला कामधंदा सोडून उपोषणाला बसलेले शेतकरी,स्थानिक रहिवाशी,महिला यांनी मोलाचे सहकार्य केले..तसेच जनआक्रोश समितीतील सदस्यांनी नियोजनात्मक पाठिंबा दर्शवून स्थानिकांना पाठबल दिले व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरुण शिवकर ,हरिष बेकावडे,राजेंद्र झेमसे,गजानन भोईर यांनी देखील मोलाचे मार्गदर्शन तथा सहकार्य केले..

जर शासनाने पुन्हा फसवणूक करण्याचा प्रयत्न केला तर यापुढील असे सध्यापणाने आंदोलन नाही तर तीव्र स्वरूपाचा जनक्रोष आंदोलन असेल असा ईशारा सुजाण नागरिक, स्थानिक रहिवाशी,शेतकरी वर्गाने तसेच सहभागी आंदोलकर्त्यांनी प्रशासनाला यावेली यांनी दिला.

Post a Comment

Previous Post Next Post