उरण दि १७(विठ्ठल ममताबादे)
ओएनजीसी कंपनी आणि लायन्स क्लब उरण यांचा अतिशय स्तुत्य,प्रशंसनीय उपक्रम.
लायन्स क्लबचे उपाध्यक्ष लायन ज्ञानेश्वर कोठावदे यांच्या प्रयत्नांनी ओएनजीसी या कंपनीच्या सीएसआर फंडातून एन. आय. हायस्कूल उरण या मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिशु वर्ग ते इ.१२ वी या सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना ऑडिओ विस्युअल या अत्याधुनिक शिक्षण पद्धतीने शिक्षण देण्यासाठी १५ टीव्ही आणि प्रत्येक वर्गाचा डिजिटल अभ्यासक्रम सेट देण्यात आला... यासाठी ओम इन्फोटेकचे निलेश साळुंखे यांचे अनमोल सहकार्य लाभले...
जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट दादर या संस्थेची एन. आय. हायस्कूल, उरण ही उरण तालुक्यातील तळागाळातील जनसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी १०१ वर्षांची उरणमधील सर्वात जुनी शाळा आहे. १४५० गरीब गरजू विद्यार्थ्यांना याचा उपयोग होणार आहे...
लायन्स क्लबच्या अध्यक्षा ला. निलिमा नारखेडे, उपाध्यक्ष ला. ज्ञानेश्वर कोठावदे, खजिनदार ला. नरेंद्र ठाकूर, ला. सदानंद गायकवाड, ला. सतीश गाडे, एल एम भोये. एन. आय. हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला...
