उरण दि १७ (विठ्ठल ममताबादे)
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उरण तालुक्यातील खोपटे गावात श्री साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन सोहळा व श्री सत्यनारायणाची महापूजा मोठया उत्साहात संपन्न झाली. पहाटे ५ वाजता श्रींची काकड आरती,६ वा.श्रीचे मंगलस्नान व साई आरती,७ वा.श्री गणेश पूजन व साई याग (यत्र), ११ वा.श्री सत्य नारायणाची महापूजा, दुपारी १२ वाजता साई आरती,१ वा. साई भंडारा (महाप्रसाद) सायंकाळी ६ वा.साई सत्व मंजरी वाचन,७ वा. साई सांज आरती,रात्री १०:३० वा. साई शेज आरती आदि विविध धार्मिक उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले... सामाजिक कार्यकर्ते बी. एन. डाकी व वीणा बाळकृण डाकी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी संचित डाकी,मिलिंद डाकी, कुंजसाई डाकी,मनस्वी म्हात्रे, शरण्या म्हात्रे, दिव्यांश डाकी, रुही डाकी आदी मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री साईसेवक मंडळ खोपटे , नवतरुण गणेश नवरात्री उत्सव मंडळ, पूर्व विभाग साईसेवक, ग्रामस्थ मंडळ खोपटे बांधपाडा, साईसेवक व मित्र परिवार यांनी विशेष मेहनत घेतली. भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून देवदर्शनाचा लाभ घेतला..
