खांब रोहा नंदकुमार कळमकर
रोहा पुगाव येथे दत्त जयंती निमित्त आ.अनिकेत तटकरे यांची सदिच्छा भेट...
रोहा तालुक्यातील श्री क्षेत्र पुगाव येथे सालाहाबाद प्रमाणे याही वर्षी श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे या प्रसंगी आमदार अनिकेत तटकरे यांनी या ठिकाणी सदिच्छा भेट देत श्री गुरुदेव दत्त मूर्तीचे मनोभावे पुजा करत दर्शन घेतले...
रोहा तालुक्यातील श्री क्षेत्र पुगांव येथे श्री क्षेत्र दत्तमंदिर येथे दरवर्षीप्रमाने ब्रम्हीभूत अमृतनाथस्वामी यांच्या कृपाछत्राखाली, गरुवर्य-त्रीनयनस्वामी, गुरुवर्य- सदाशिवस्वामी, गुरुवर्य-अबरधरस्वामी,गुरुवर्य- शिवानंदस्वामी, गुरुवर्य - नरेंद्रस्वामी, गुरुवर्य -नरेंद्रनाथास्वामी, यांच्या आशीर्वादात्मक प्रेरणेने सांप्रदाय भारती गुरुवर्य जनार्धनस्वामी (वाडीकर महाराज), सदानंदस्वामी- गोपाळ चव्हाण महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तजन्मोस्तव व अखंड हरीनाम सोहळा होत आहे आज दत्तजयंती चे औचित्य साधत आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी श्री क्षेत्र दत्तमंदिर पुगांव येथे या निमित्ताने श्री दत्तगुरूंचे दर्शन घेतले...
यावेळी आमदार अनिकेत तटकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगीतले की मागील वर्षी भक्त निवासी गृहांसाठी रू.१५ लाख इतका निधी आणला होता परंतू काही तांत्रिक अडचणी मुळे याचे काम होऊ शकले नाही परंतू यावेळी येथील भाविकांना दत्तमंदिराकडे जाणारा रस्ता प्रथम मंजूर करण्याचे आश्वासन सर्व संप्रदाय व पुगांव ग्रामस्थ महिला यांच्या समोर देत पुढील दत्तजयंती पर्यंत सदरचा रस्ता पूर्ण होईल दिले..
तसेच पुढे बोलतांना सांगितले की माझी आजी गीताताई तटकरे या ९२ वर्षाच्या आहेत तरी आज मला सकाळी तु कोणकोणत्या मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेस माञ प्रथम पुगांव येथील दत्तमंदिर येथे जा व माझा नमस्कार दत्तमहाराज चरणी दे असे मला सांगण्यात आले कारण त्या न विसरता पुगांव येथे दत्तमदिर मध्ये येऊन दर्शन घेण्यासाठी येत असत .यावेळी गुरुवर्य वाडीकर महाराज,नारायण धनवी, आंनता म्हसकर, राम धूपकर, राम कळमकर, सुधीर शेळके, सुनील म्हसकर, सुभाष देशमुख, हरिश्चन्द्र देशमुख, अशोक झोलगे,सह असंख्य वारकरी संप्रदाय व ग्रामस्थ व महिला, तरुण- तरुणी तसेच दत्त भक्त उपस्थित होते...