महाराष्ट्र वेदभुमी

रोठखुर्द ग्रामपंचायतीने बोगस दाखले प्रमाणित करुन शासनाची दिशाभूल केल्याचे प्रकार उघडकीस!

शहानवाज मुकादम / रोहा

संबंधित प्रशासनाकडून सदरविषयी चौकशी अंत कारवाईची मागणी...

रोहा तालुक्यातील रोठखुर्द ग्रामपंचातीमधील अजब कारभार प्राथमिक शिक्षक मुख्यालयी रहात असल्याचे बोगस प्रमाणित दाखले दिल्याचे प्रकार उघडकीस, संबंधित प्रशासनाकडून चौकशीअंत कारवाईची मागणी होत आहे...रोठखुर्द ग्रामपंचायतीने असे किती बोगस दाखले दिले आहेत...शासकीय कर्मचाऱ्यांने सेवेच्या मुख्यालयी रहावे या आदेशाचे पालन होत आहे का? याविषयी सरपंचाच्या सहीचे दाखले देऊन शासनाची प्रस्तुतविषयी शासनाची उघड उघड दिशा भूल केली आहे...

प्राथमिक शिक्षक श्रीम.स्मिता संदीप सानप हे श्रीमती.काशी गोरख पाटील यांच्या घर क्रमांक २०२,तर श्री.उमाजी मारुती जाधव हे श्री विनायक रामजी मोरे यांच्या घर क्रमांक २०७, आणि श्री अमिता गजानन बामणे या श्रीमती काशी गोरख पाटील यांच्या घर क्रमांक २०२ येथे सदर शिक्षक व शिक्षिका माहे मे २०१९ ते २६/१२/२०२३ पर्यंत याच ठिकाणी शाळेच्या मुख्यालयी रहात आहेत..असे शाळा व्यवस्थापन समितीने देखील लिहून दिल्याचे सदर दाखल्यात नमुद केले आहे... मात्र वरील शिक्षक शिक्षिका मुख्यालयी रहातच नाहीत, हे चौकशीअंती उघड होत आहे...असे बोगस दाखले देऊन शासनाची दिशाभूल केली जात आहे... हे कृत्य निंदणीय असून दंडात्मक कारवाईस पात्र आहेत, तसेच या ग्रामपंचायतीच्या मार्फत किती दाखले दिले असतील याची चौकशी व्हावी असे नागरिकांनी मागणी केली आहे...यावरुनच ग्रामपंचायतीचा पारदर्शकता जनतेसमोर येत आहे तरी अशा बोगस कारभाराची चौकशी होऊन दोषीवर दंडात्मक कारवाई व्हावी अशी मागणी जनसामांन्यातून होतांना दिसत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post