धाटाव रोहा अनंता म्हसकर
मंगळवार दिनांक२६/१२/२०२३ रोजी पिंपळवाडी गावामध्ये श्री. दत्त कृपा मंदिरामध्ये दत्त जयंतीचे औचित्य साधून विधान परिषद मा.आ. अनिकेत तटकरे यांना पिंपळवाडी ग्रामस्थांनी श्री दत्त मंदिराचे पुननिर्माण व्हावे या संबंधित निवेदन देताच आमदार श्री अनिकेत तटकरे यांनी ग्रामस्थांना येणार्या दत्त जयंतीपर्यंत दत्त मंदीर जिर्नोद्धारसाठी निधी मिळवुन देणार असे आश्वासन दिले..
तसेच अनिकेत तटकरे यांचे आभार मानताना मा. सभापती श्री बाळकृष्ण बामणे, उपसरपंच श्री सूरज कचरे, नाना कोंडे, आत्माराम भगत, बाला बामणे, नंदकुमार मरवडे, शांताराम अगले, जितेंद्र सुटे तसेच सर्व पिंपळवाडी ग्रामस्थ उपस्थित होते..