शहानवाज मुकादम/खालापूर
आई संस्था वावंजे तर्फे माधवबाग आरोग्य सहल...
आई संस्था वावंजे तर्फे आरोग्य सहल आयोजित करण्यात आली होती... ४० वावंजे रहिवाशी, पुरुष व महिलांनी मोफत विविध तपासणीचा फायदा घेतला.. या नियोजनात सकाळचा अल्प आहार, दुपारच जेवण प्रवासा साठी बस माधव बाग हॉस्पिटल खोपोली कडून फ्री सुविधा करण्यात आली होती...
या सर्व आयोजनामध्ये माधव बागचे डॉ. तुषार पाटील, आई संस्थेकडून संस्थापक /चेअरमन शेख अब्दुल, करुणा ताई , प्रकाश मुकादम, तरन्नुम खान, प्रेरणा ताई यांनी विशेष योगदान देऊन ही आरोग्य सेवा सहल यशस्वी केली...
सहलीत उपस्थित आरोग्य शिबिराचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावरील समाधान हीच मानव सेवा सक्षम समृद्ध निरोगी समाज घडवण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे मत आई संस्थेचे संस्थापक /चेअरमन शेख अब्दुल यांनी व्यक्त केले...